चेन्नई: देशात २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून काही काळ बाकी असला, तरी आतापासूनच राजकीय वर्तुळात पंतप्रधानपदाच्या दावेदारावरून चुरस पाहायला मिळत आहे. एकीकडे राजकीय आघाड्या आणि विविध सर्वेक्षणे समोर येत असताना, दुसरीकडे तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधानपदावरून आता तामिळनाडूतील काँग्रेस पक्ष आणि 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) पक्ष यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली असून, काँग्रेसने थेट मंत्रिमंडळातील राजीनाम्याचा इशारा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका वाद?
काही दिवसांपूर्वी 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) चे प्रमुख तथा तामिळनाडूचे नेते सी. जोसेफ विजय यांना देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. टीव्हीके पक्षाच्या गोटातून आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री एम. शरतकुमार यांनी, विजय हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील असा जोरदार दावा केला होता. अभिनेते-राजकारणी विजय यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या दाव्यामुळे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
काँग्रेस नेते राजेश कुमार यांचा कडक इशारा:
तमिळनाडू सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते राजेश कुमार यांनी यावर उघडपणे प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, २०२९ मध्ये देशाचे पंतप्रधान केवळ आणि केवळ राहुल गांधी हेच असतील. जर 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) किंवा त्यांचे नेते या भूमिकेशी सहमत नसतील आणि त्यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाला किंवा दाव्याला समर्थन दिले नाही, तर तामिळनाडू मंत्रिमंडळात सहभागी असलेले काँग्रेसचे मंत्री क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे देतील, असा सज्जड दम आणि इशारा काँग्रेस नेते राजेश कुमार यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे.
देशभरातील सर्वेक्षणातील आकडेवारी:
नुकत्याच समोर आलेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणात देशात जर आज निवडणुका झाल्या तर कोणाला पसंती मिळेल, याचे चित्र समोर आले होते. या सर्वेक्षणात देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच लोकांची पहिली पसंती असल्याचे दिसून आले, तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जनतेने कौल दिला आहे. विशेष म्हणजे, या सर्वेक्षणात तामिळनाडूचे नेते सी. जोसेफ विजय हे तब्बल ९ टक्के मते मिळवून थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत विजय यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या स्थानी येणे हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. याच राजकीय घडामोडींमुळे तामिळनाडूतील आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत असल्याचे दिसत आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


