बारामती तालुक्यातील विविध भागांत वजन-मापात तफावत करून ग्राहक आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांमध्ये फेरफार किंवा छेडछाड करून वजनात तफावत केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. या सर्व प्रकाराची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.
बारामतीसह ग्रामीण भागात बांधकामासाठी लागणारे लोखंड, पोलाद तसेच इतर साहित्य खरेदी करताना वजनानुसारच बिल आकारले जाते. मात्र, काही ठिकाणी या वजनकाट्यांमध्ये संगनमताने किंवा बेकायदेशीरपणे छेडछाड करून प्रत्यक्षात खरेदीदारांना कमी माल दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दुसरीकडे, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दूध संकलन करताना आधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांचा वापर केला जातो. काही विशिष्ट संकलन केंद्रांवरील काट्यांमध्ये छेडछाड करून वजनात फेरफार केला जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी थेटपणे केल्या आहेत. दूध हा रोजचा व्यवसाय असल्याने आणि दररोज मोठ्या प्रमाणात दूध संकलित होत असल्याने वजनातील अगदी किरकोळ तफावत सुद्धा शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पणावर मोठा परिणाम करणारी ठरू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना दरमहा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
वजन आणि मापातील या संभाव्य फसवणुकीला आळा घालण्यासाठी वैधमापनशास्त्र विभागाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे बनले आहे. बाजार समित्या, लोखंड व बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने, तसेच दूध संकलन केंद्रांवर अचानक भेटी देऊन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांची कसून तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या काट्यांचे अधिकृत सील, पडताळणी प्रमाणपत्र, त्याची वैधता आणि प्रत्यक्ष वजनातील अचूकता यांची कसून तपासणी करून जे व्यावसायिक किंवा केंद्रचालक दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, असे नागरिक व शेतकरी वर्गाचे ठाम म्हणणे आहे.
तक्रार व कारवाईसाठी प्रभावी यंत्रणेची गरज वजन आणि मापातील तफावतीमुळे ग्राहक किंवा शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी त्यांना कोणतीही अडचण न येता तक्रार करण्यासाठी एक स्पष्ट व सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देणे काळाची गरज बनली आहे. संबंधित शासकीय विभागाने विशेष मोहीम राबवून बारामती तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या वजनकाट्यांची खात्रीशीर तपासणी करावी. तसेच दोषी आढळलेल्या व्यावसायिकांची नावे व कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, जेणेकरून इतरांवर वचक बसेल. यासंदर्भात वजन-मापातील फसवणुकीच्या सर्व अधिकृत तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी होऊन लवकरात लवकर वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
"फसवणूक झाल्याचा मला स्वतःला वैयक्तिक अनुभव आहे. बारामती तालुक्यातील अनेक दूध संस्थांच्या वजन-मापात मोठी तफावत आढळते. शेतकरी व ग्राहकांनी याबाबत स्वतः जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. वजनात तफावत निदर्शनास आल्यास त्याला कडाडून विरोध केला पाहिजे आणि तातडीने कारवाईची मागणी केली पाहिजे." — धीरज गायकवाड, दूध उत्पादक शेतकरी.
"हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. याविषयी प्राप्त माहितीची शहानिशा करून आम्ही तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करू. वजन-मापातील फसवणुकीसंदर्भात थेट मुख्य कार्यालयाला ई-मेलद्वारे किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येते. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. ग्राहकांनी व शेतकऱ्यांनी पूर्ण जागरूकपणे पुढे ये येऊन अशा बाबींची तक्रार करावी." — राजेंद्र टाळकुटे, वैधमापनशास्त्र निरीक्षक, बारामती.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



