नवी मुंबईतील राजकारण तापले! गणेश नाईक-एकनाथ शिंदे वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. हा वाद आता सत्तासमीकरणे बदलण्यापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समिती आणि स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीवरून राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. परिवहन समितीच्या १२ सदस्य पदांसाठी भाजपने १२ उमेदवार उभे केल्याने निवडणूक अटळ झाली आहे.

या वादामुळे दोन्ही गटांमध्ये पोस्टर युद्ध सुरू झाले आहे. नवी मुंबईत स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून नाईक समर्थकांनी बॅनर बाबा म्हणत प्रतिउत्तर दिले. गणेश नाईकांनी श्रीकांत शिंदेंना माजी खासदार करणार असा इशारा दिला होता. यावर श्रीकांत शिंदेंनी नाईकांनाच स्मृतिभ्रंश झालाय असे प्रत्युत्तर दिले. हा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *