Sharad Pawar : "माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना राजकारणात येण्यासाठी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावले होते. त्यानंतर त्यांच्यासाठी विधानसभेचे तिकीट मागायला गेलो, परंतु, त्यावेळी त्यांना तिकीट मिळाले नाही. तिकीट कापल्यानंतर त्यांना भेटलो त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. माझ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता आणि तिकीट पण मिळालं नाही. त्यांच्यावर हे संकट माझ्यामुळे आलं होतं, अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात शरद पवार बोलत होते. शरद पवार यांच्या हस्ते श्रीनिवास पाटील आणि मधुकर भावे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकारणातील प्रवेशावेळी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यायला लावल्याची आठवण शरद पवार यांनी सांगितली. राजकारणात प्रवेश करण्यासाठी सुशील कुमार शिंदे यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी पुढे त्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तयार केले. परंतु, सोलापूर (करमाळा तालुका) मतदार संघातून सुशीलकुमार शिंदे यांना तिकीट मिळाले नव्हते. ही आठवण सांगताना शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदेवर त्यावेळी आपल्यामुळे संकट आल्याचे सांगतले. शरद पवार म्हणाले, माझ्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांना विधानसभेचे तिकीटही मिळाले नाही. या प्रकारानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो. परंतु, त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. या घटनेनंर मी गृहराज्यमंत्री झालो. त्यावेळी त्यांना माझ्याकडे वकिली करायला सांगितली. त्यांची वकिली जोरात चालली आणि नंतर त्यांना तिकीट मिळालं. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत पोहोचले, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनीही शरद पवार यांनीच आपल्याला राजकारणात पुढे आणल्याचे सांगितले. ते म्हणाले, शरद पवार यांच्यामध्ये आचार्य अत्रे यांच्यातील गुण आहेत. शिवाय कष्टाळू मुलांना पुढे घेऊन जाण्याची त्यांना सवय आहे. मला आणि श्रीनिवास पाटील यांना त्यांनी राजकारणात आणलं. परंतु, पुढं मी त्यांच्यासोबत राहिलो नाही ही खंत आहे. शरद पवार एक विचारवंत नेते आहेत. मी काटे नसलेलं गुलाब आहे, असं ते म्हणतात. परंतु, आपल्याकडील काटे दुसऱ्याला देऊ नये, हे शरद पवार यांनीच मला शिकवलं, अशी स्तुती सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी केली.
हे पण वाचा-
शहर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- अग्निशामक अधिकाऱ्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू! ठाणे स्टेशन परिसर हादरला! गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटेचा थरार;
- सांगलीकरांनो काळजी घ्या! पुढील ५ दिवस ताशी ५० किमी वेगाने वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा!
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
महाराष्ट्र
- अकोल्यात मोठी दुर्घटना टळली! सिटी हॉस्पिटलमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग; रुग्ण आणि नातेवाईकांची प्रचंड धावपळ.
- मेळघाटात भीषण आगडोंब! रोरा, सेमाडोहसह दुर्गम जंगल आगीच्या विळख्यात; मौल्यवान वनसंपदा खाक, वन्यजीव संकटात!
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
गुन्हा
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
- पाटण्यात भयंकर कृत्य! घटस्फोटाचा राग अन् पैशांची हाव; नराधम पतीने दोन चिमुरड्यांसह सासरच्या ५ जणांना पेट्रोल ओतून पेटवले!
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.























Subscribe to my channel




