पुणे: महाराष्ट्रात आगामी काळात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम पार पडणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यातील महत्त्वाच्या अशा तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत. या राजकीय घडामोडींमध्येच, पुण्यातील ध्वनिप्रदूषण, ढोलवादन आणि डीजेच्या कर्णकर्कश दणदणाटाविरोधात सडेतोड भूमिका घेत राज्यभरात चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्या संभाव्य राजकारण प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका विशेष पोस्टमुळे या चर्चांना मोठे उधाण आले आहे.
पुण्यातील गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये होणाऱ्या अवाजवी ध्वनिप्रदूषणाविरुद्ध आणि डीजेच्या वापराविराधात विद्यानंद बापट यांनी अत्यंत निर्भयपणे आवाज उठवला होता. एवढेच नव्हे तर या भूमिकेमुळे त्यांच्यावर काही हल्ल्याचे प्रसंगही ओढवले, परंतु तरीही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. आपल्या उत्तम मराठी भाषेवरील प्रभुत्व, सुसंस्कृत शैली आणि रोखठोक विचारांमुळे ते अल्पावधीतच महाराष्ट्रभर पोहोचले आणि एका रात्रीत जनमानसात लोकप्रिय ठरले. उत्सवांचे बिघडत चाललेले स्वरूप आणि त्यातील ओंगळवाणेपणा त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने चव्हाट्यावर आणला.
असीम सरोदे यांची 'एक्स' (ट्विटर) पोस्ट ठरली चर्चेचे केंद्र:
प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी विद्यानंद बापट यांच्यासोबतचा आपला फोटो शेअर करत सोशल मीडियावर एक महत्त्वाची पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसाविरोधात निर्भयपणे उभा असणारा 'विद्यानंद बापट' हा अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप चव्हाट्यावर आणणारा खरा हिरो ठरला आहे."
पुढे बोलताना सरोदे यांनी, "विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू आणि प्रत्येक सामाजिक प्रश्नाची नेमकी जाणीव असणारा विद्यानंद बापट आज प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य बनला आहे. भाषेचा स्तर अजिबात बिघडू न देता, विषयाला घट्ट धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापट यांनी आगामी 'पुणे पदवीधर मतदारसंघाची' निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते?" अशी खुली विचारणा जनतेला केली आहे.
सोशल मीडियावर संमिश्र आणि उत्साही प्रतिक्रिया:
असीम सरोदे यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर जोरदार वाद-विवाद आणि चर्चेला सुरुवात झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी आणि नागरिकांनी विद्यानंद बापट यांच्या संभाव्य उमेदवारीचे जोरदार स्वागत केले आहे. भारतीय समाजाला अशाच निर्भीड, तर्ककठोर आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ माणसाची गरज असून बापट यांनी ही निवडणूक लढवावी, ते १०० टक्के विजयी होतील, अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत. तर दुसरी मतदारसंघातल्या मतदारांची जागरूकता आणि राजकीय समीकरणे कशी असतील, यावरही सोशल मीडियावर युझर्सकडून विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यामुळे आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यानंद बापट यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




