नागपूर: सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या नैऋत्य मान्सूनने गुरुवारी केरळमध्ये प्रवेश केला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत हा मान्सून गोव्यापर्यंत पोहोचून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात धडक देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांसाठी ही दिलासादायक बातमी असली, तरी विदर्भातील नागरिकांना मात्र आनंदसरींसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत विदर्भवासियांना तीव्र उकाड्याचा आणि उष्णतेचा त्रास सहन करावा लागणार आहे.
नागपुरात तापमानाचा पारा वाढला
गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या आकाशात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. असे असले तरी नागरिकांना उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळालेला नाही. तीन दिवसांपूर्वी ४० अंशांवर असलेला पारा आता पुन्हा वाढू लागला आहे. बुधवारी ४२ अंशांवर असलेले नागपूरचे तापमान गुरुवारी ४२.६ अंशांवर पोहोचले. दिवसभर उन्हाच्या तीव्र चटक्यांमुळे आणि शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारांमुळे नागरिक बेजार झाले होते. केवळ दिवसच नव्हे, तर रात्रीचे तापमानही २८ अंशांवर पोहोचल्यामुळे रात्रीचा उकाडाही प्रचंड वाढला आहे.
ब्रह्मपुरी देशात सर्वात उष्ण!
गुरुवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे तब्बल ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे संपूर्ण देशात सर्वाधिक ठरले. याशिवाय गडचिरोली आणि वर्धा येथील तापमान ४२ अंशांच्या पार गेले असून, विदर्भातील इतर शहरांमध्ये तापमान ४१ अंशांच्या सरासरीत नोंदवले गेले आहे. जून महिन्यातील वातावरणामध्ये आर्द्रता जास्त (दमटपणा) असल्याने हा उकाडा आणखी त्रासदायक ठरू लागला आहे.
पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता, पण उकाडा कायम राहणार
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत म्हणजेच ५ जून रोजी नागपूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह तुरळक पावसाची शक्यता आहे. ६ जूनला आकाश प्रामुख्याने ढगाळ राहील, तर ७ आणि ८ जून रोजी पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, या पावसाच्या आणि ढगाळ वातावरणाच्या काळातही तापमान कमी होणार नसून, ते उलट ४३ अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी उकाड्यापासून त्वरित दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हं नाहीत.
विदर्भात मान्सून कधी येणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात १० जूननंतर मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) पावसाची शक्यता आहे. तर, मुख्य मान्सूनचे विदर्भातील आगमन १६ जूनपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या मान्सूनच्या पावसासाठी विदर्भवासियांना आणखी काही दिवस वाट पाहावीच लागणार आहे.
शहर
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
- बारामती: विजय राष्ट्रवादीचा, कसोटी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची..! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचे संपूर्ण राजकारण आणि सविस्तर विश्लेषण
गुन्हा
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!

























Subscribe to my channel




