नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तसेच अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या 'Safe Food Safe Maharashtra' या विशेष मोहिमेंतर्गत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा परिसरातील प्रमुख हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. या कारवाईत लोणावळ्यातील चार नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
स्वच्छतेचा अभाव, झुरळे आणि अन्न साठवणुकीतील त्रुटी उघड:
एफडीएच्या पथकाने केलेल्या तपासणीत संबंधित हॉटेल्सच्या स्वयंपाकघरातील आणि बेकरी विभागातील अस्वच्छता, कीटक व झुरळांचा वावर, तसेच अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. काही ठिकाणी स्वयंपाकघराच्या फरशीवर पाणी साचणे, झाकण नसलेले कचऱ्याचे डबे ठेवणे, कच्चे व शिजवलेले किंवा शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ स्वतंत्रपणे न ठेवणे, पदार्थांवर व बाटल्यांवर लेबल नसणे, तसेच उपकरणे व यंत्रांची नियमित खोलवर स्वच्छता (डीप क्लीनिंग) न करणे अशा बाबी आढळून आल्या. तसेच कामगारांसाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे, प्रशिक्षण प्रमाणपत्रे, पेस्ट कंट्रोल नोंदी, वापरलेल्या खाद्यतेलाच्या नोंदी आणि परवान्यातील इतर नियमांचे पालन न केल्याचेही समोर आले.
चारही हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित; नियमांचे कठोर पालन करण्याचा इशारा:
तपासणीमध्ये आढळलेल्या या गंभीर त्रुटी आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाची गंभीर दखल घेत प्रशासनाने लोणावळ्यातील त्या चारही नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्याची कारवाई केली आहे. पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या नागरिक व पर्यटकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी अन्न व्यवसायांनी स्वच्छता, साठवणूक आणि सर्व कायदेशीर मानकांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात परवाने निलंबित करणे किंवा रद्द करणे यासारखी कठोर कारवाई पुढेही सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शहर
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- पुणे: सावरकरांच्या नावाने राजकारण नको; न्यायालयातील प्रश्नांना पुराव्यांनी उत्तरे द्या, राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
महाराष्ट्र
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- यवतमाळ: बाबूजींच्या २९व्या स्मृतीदिनानिमित्त सुरांची स्वरांजली आणि मान्यवरांची उपस्थिती अमित कुमार व बोमन इराणी येणार यवतमाळमध्ये!
- पुणे: सावरकरांच्या नावाने राजकारण नको; न्यायालयातील प्रश्नांना पुराव्यांनी उत्तरे द्या, राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार
गुन्हा
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा

























Subscribe to my channel




