गडचिरोली: जागतिक आदिवासी दिनाचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच, धानोरा तालुक्यातील 'जपतलाई' येथील एका अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शाळेच्या वसतिगृहात झोपेत असताना विषारी साप चावल्यामुळे तीन चिमुरड्या विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने केवळ पालकांमध्येच नव्हे, तर संपूर्ण परिसरात मोठा आक्रोश निर्माण झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण? जपतलाई येथील 'कुप्पा लिंगो शैक्षणिक व संस्कृती विकास संशोधन शाळा' या अनुदानित आश्रम शाळेच्या वसतिगृहात ही दुर्घटना घडली. शुक्रवारी रात्री साधारणतः अडीच वाजण्याच्या सुमारास वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. यामध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) या इतर तीन मुलींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रशासनाचा गंभीर हलगर्जीपणा या घटनेनंतर शाळेतील सोयीसुविधांचा भयावह चेहरा समोर आला आहे. वसतिगृहात विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा (बेड्स) उपलब्ध नाहीत, अशी तक्रार अनेकदा करूनही प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे नाईलाजाने या मुलींना जमिनीवर गादी टाकून झोपावे लागते. एवढेच नाही तर, ही घटना घडली तेव्हा वसतिगृहाची महिला अधीक्षक कर्तव्यावर उपस्थित नव्हत्या, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा हा हलगर्जीपणा आता त्यांच्या जीवावर बेतला आहे.
आक्रमक रोष या घटनेनंतर 'आझाद समाज पार्टी'ने प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. संस्थेचे पदाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसत असताना, आदिवासी मुलांची स्थिती अतिशय दयनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी आणि जबाबदारी स्वीकारून संबंधित पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




