सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आणि विशेषतः आयटी क्षेत्रातील सुशिक्षित तरुण अभियंत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर साकारल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित 'सोलापूर आयटी पार्क'चा (Solapur IT Park) मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या (MKVDC) नियामक मंडळाने यापूर्वीचा 'लॉजिस्टिक पार्क'चा ठराव रद्द केला असून, ही २० हेक्टर मोक्याची जागा आता आयटी पार्कसाठी एमआयडीसीकडे (MIDC) विनामोबदला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
लॉजिस्टिक पार्कचा ठराव रद्द, आयटी पार्कला प्राधान्य
साधारणतः २०२१-२२ मध्ये होटगी येथील तलावाच्या जमिनीमधील (गट क्र. ५७६) २० हेक्टर जागा लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी देण्याचा ठराव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळात संमत झाला होता. मात्र, सोलापूर शहरात विमानसेवा सुरू झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर आयटी हब आणि रोजगार निर्मिती व्हावी, अशी मागणी स्थानिक तरुण आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारने जुना ठराव रद्द करून ही जागा आयटी पार्कसाठी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे जागा हस्तांतरणातील तांत्रिक अडचण दूर झाली आहे.
नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत अंतिम मंजुरी
जलसंपदा विभागाकडून ही २० हेक्टर जागा एमआयडीसीला विनामोबदला हस्तांतरित करण्यासाठी नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत अंतिम मंजुरी दिली जाईल. साधारणतः दोन महिन्यांतून एकदा होणाऱ्या या बैठकीत हा ठराव लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सातत्याने प्रयत्न करत आहेत. जागा हस्तांतरित होताच एमआयडीसीकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबवून आयटी पार्कच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
युवकांसाठी रोजगार क्रांती आणि वीज करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून या होटगी आयटी पार्ककडे पाहिले जात आहे. सोलापुरात हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक व परिसरातील हजारो तरुण अभियंत्यांना पुणे, मुंबई किंवा बेंगलोर येथे न जाता सोलापुरातच रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे नोकरीसाठी होणारे तरुणांचे स्थलांतर थांबेल. विशेष म्हणजे, या आयटी पार्कला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी 'एनटीपीसी'च्या (NTPC) सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासोबत आधीच विशेष करार करण्यात आला आहे.
होटगीतील तलावाच्या जागेचा ताळेबंद (एकूण २८४.७४ हेक्टर):
-
बुडीत क्षेत्र: २४० हेक्टर
-
प्रस्तावित आयटी पार्कसाठी: २० हेक्टर
-
सौरऊर्जा (सोलार) प्रकल्पासाठी: १४.६५ हेक्टर
-
पर्यटन विकासासाठी: ३.८३ हेक्टर
-
महावितरण (MSEB) उपकेंद्रासाठी: २.८ हेक्टर
-
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी: ०.६९ हेक्टर
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




