पुणे: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी बदनामी खटल्याची सुनावणी तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.
विशेष एमपी-एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री. अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर हा महत्त्वाचा खटला चालवला जात आहे. या खटल्यामध्ये राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार हे फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा सखोल उलट तपास (Cross-examination) घेत आहेत. तर फिर्यादी सात्यकी सावरकर यांच्या बाजूने अॅड. संग्राम कोलटकर हे कायदेशीर बाजू सांभाळत आहेत.
दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान आणि उलट तपासाच्या सत्रामध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येची ऐतिहासिक पार्श्वभूमी, नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांची त्या प्रकरणातील भूमिका, तसेच गोपाळ गोडसे आणि त्यांच्या पत्नी सिंधू गोडसे यांनी दिलेल्या विविध मुलाखतींच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे आणि सखोल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
राहुल गांधींचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उलट तपासादरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी गोपाळ गोडसे यांच्या तीन वेगवेगळ्या मुलाखतींचे व्हिडिओ मान्य केले. तसेच संबंधित व्हिडिओ हे त्यांचे आजोबा गोपाळ गोडसे यांच्याच मुलाखतींचे असल्याचेही त्यांनी मान्य केल्याचे बचाव पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
या मुलाखतींच्या संदर्भात महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत गोपाळ गोडसे यांनी केलेल्या कथित वक्तव्यांचा उलट तपासात विशेष उल्लेख करण्यात आला. तसेच सिंधू गोडसे यांच्या मुलाखतीतील काही कथित वक्तव्यांचा संदर्भ घेत, महात्मा गांधींच्या हत्येपूर्वी त्या घटनेची पूर्वकल्पना किंवा माहिती असल्याचा दावा करण्यात आल्याचे ॲड. पवार यांनी सांगितले.
याशिवाय, नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) काही संबंध होता का किंवा ते संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते का, यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरेही फिर्यादीकडून नोंदवून घेण्यात आली. महात्मा गांधी यांच्या हत्येची घटना, नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांची भूमिका, त्यांचे हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले वैचारिक संबंध, गोपाळ गोडसे यांच्या उत्तरकाळातील मुलाखती आणि महात्मा गांधी हत्ये संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री. जीवनलाल कपूर यांच्या आयोगाची झालेली स्थापना या सर्व ऐतिहासिक आणि कायदेशीर बाबींचा सविस्तर परस्पर संदर्भ तपासण्याचा प्रयत्न ॲड. पवार यांच्याकडून करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर, सात्यकी सावरकर यांचा पुढील उलट तपास होणे या सुनावणीदरम्यान अपेक्षित होते. मात्र, न्यायालयीन कामकाजासाठी माननीय न्यायाधीश श्री. अमोल श्रीराम शिंदे हे उपलब्ध न झाल्याने ठरलेली ही पुढील सुनावणी होऊ शकली नाही.
या खटल्याच्या कायदेशीर कामकाजात अॅड. ज्ञानेश्वरी जाधव व अॅड. कैलास जिरे हे बचाव पक्षास (राहुल गांधींच्या वतीने) सक्रियपणे सहाय्य करीत आहेत. या बहुचर्चित खटल्याची पुढील सुनावणी आता आगामी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.
शहर
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
महाराष्ट्र
- कोल्हापूर: पेठवडगावात थरारक अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली सापडून फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग


























Subscribe to my channel




