
Pune : मुलीच्या सुखासाठी बापाने पाण्यासारखा पैसा खर्च केला, तब्बल २ कोटी रुपये खर्च करुण लग्न लावले, हुंड्यात 'फॉर्च्युनर' कार आणि ५५ तोळे सोने दिले; तरीही सासरच्या मंडळींची पैशांची हाव काही केल्या संपली नाही. याच पैशाच्या हव्यासापोटी सुरू झाला २६ वर्षीय तरुणीचा अनन्वित छळ. पुण्यात हुंड्यासाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात सासऱ्यानेच सुनेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरकळ (ता. खेड) येथील लोखंडे कुटुंबात हा प्रकार घडला आहे. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २६ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पती आदित्य अनिल लोखंडे (वय २८), सासरे अनिल किसन लोखंडे (वय ५३), सासू सुवर्णा अनिल लोखंडे (वय ४८) आणि नणंद समृद्धी अनिल लोखंडे (वय २५) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला आणि आरोपी आदित्य यांचा विवाह २२ ऑगस्ट २०२३ रोजी अत्यंत शाही थाटात पार पडला होता. वधूच्या वडिलांनी आपल्या लेकीला सासरी त्रास होऊ नये म्हणून लग्नात सढळ हाताने खर्च केला होता. यामध्ये तब्बल ५५ तोळे सोने, २ किलो चांदीची भांडी, घरातील महागड्या इलेक्ट्रिक वस्तू आणि 'फॉर्च्युनर' गाडी असा जवळपास २ कोटी रुपयांचा ऐवज हुंडा म्हणून दिला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात सासरच्यांनी आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली.
|
Latur : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन;९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास |
लग्नानंतर काही दिवसातच पती आदित्यचा वाढदिवस आला. याचे निमित्त साधून सासरच्या मंडळींनी माहेरून आणखी पैसे आणि दागिने आणण्यासाठी विवाहितेचा छळ सुरू केला. वाढदिवसाला सोन्याचे कडे हवे म्हणून तगादा लावला. मुलीचा त्रास कमी व्हावा म्हणून वडिलांनी पुन्हा ४ तोळ्याचे सोन्याचे कडे, २५ हजारांचे घड्याळ आणि वाढदिवसाच्या खर्चासाठी ३५ हजार रुपये रोकड दिली. मात्र, तरी देखील 'आणखी पैसे घेऊन ये' असे म्हणत सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवला.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पैशांच्या लोभापायी सासरच्यांनी माणुसकी सोडलीच, पण सासऱ्याने नात्याला काळीमा फासणारे कृत्य केले. सासरे अनिल लोखंडे यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. अखेर सततच्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेतली. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




