सातारा: जेजुरीला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात आजोबा-नातीचा मृत्यू, ५ जण गंभीरकोल्हापूरवरून जेजुरीला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा साताऱ्याजवळ भीषण अपघात झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील म्हसवे (ता. सातारा) हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात एका ७५ वर्षीय आजोबांचा आणि १६ वर्षीय नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला
असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा आरळे (ता. करवीर) येथील काही भाविक टेम्पो ट्रॅव्हलरमधून जेजुरीला दर्शनासाठी निघाले होते. रविवारी पहाटे ४:३० च्या सुमारास सातारा परिसरातील डी-मार्ट समोरील महामार्गावरून जात असताना, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन आदळली.धडक इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. मृत आणि जखमींची ओळखया दुर्घटनेत एकनाथ (बापू) कांबळे (वय ७५) आणि स्नेहल उत्तम कांबळे (वय १६) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी वाहनातील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. उत्तम कांबळे, अमित कांबळे, मधुकर कांबळे, आशा कांबळे आणि दीपक कांबळे असे ५ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांचा तपास सुरूअपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, ट्रक चालकाने पार्किंग लाईट न लावता वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्याने आणि टेम्पो चालकाचा अतिवेग अशा दोन्ही कारणांमुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




