रोहित पवार यांनी विखे पाटलांना सुनावलं
राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. मात्र हा अपघात नसून त्यात घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यावरूनच अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन या अपघाताच्या आदल्या दिवशीच्या घटना, तसेच विमानातील काही गोष्टी, काही त्रुटी निदर्शनास आणऊन दिल्या, पुरावेही सादर केले. मात्र यावर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल टीका केली होती. रोहित पवार अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या या टीकेवर रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात मुंबई व दिल्लीत तसेच काल (18 फेब्रुवारी) मुंबईत पुन्हा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ब्लॅक बॉक्स, विमानातील इंधन तसेच व्हीएस कंपनीशी सत्तेतल्या काही लोकांची जवळीक अशा अनेक मुद्यांवर रोहित पवार यांनी भाष्य केलं होतं. मात्र त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर विखे पाटील यांनी रोहित पवारांवर बोचरी टीका केली. काही लोक दुःखात आधार देण्याऐवजी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण काय म्हणते, याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हा स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेवर रोहित पवार यांनी एका पोस्टमधून प्रत्युत्तर दिले.
रोहित पवार यांची पोस्ट काय ?
अजित पवारांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी त्यांच्या X ( पूर्वीच ट्विट) अकाऊंटवर एक पोस्ट लिहीली आहे. काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, असं रोहित पवार यांनी यात म्हटलं आहे.
रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी..
” ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला नसताना विखे पाटील साहेब ओढून ताणून या विषयाला राजकारणाशी जोडून विमान अपघाताच्या चौकशीला वेगळं वळण तर देत नाहीत ना? काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, त्यामुळं त्यांनी किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, अशी माझी त्यांना विनंती आहे” असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 18, 2026
काय म्हणाले होते विखे-पाटील ?
काल राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. ” या (अजित पवार विमान अपघात) प्रकरणात CBI चौकशीची मागणी करण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही DGCI (डायरेक्टर जनरल ऑफ क्राईम इन्व्हेस्टिगेशन) यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आता वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय, हे योग्य नाही. अशा दुर्दैवी घटनेवर राजकारण करणे हे अधिक दुर्दैवी आहे. सत्य जे आहे ते समोर येईलच. या प्रकरणाचे राजकारण करू नये” असं ते म्हणाले होते.
” ही घटना मोठी आणि वेदनादायक घटना आहे. त्याचं सगळ्यांनाच दुःख झालं आहे. मात्र काही लोक दुःखात आधार देण्याऐवजी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण काय म्हणतंय याला फार महत्त्व द्यायला नको. हा सगळा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे. माझी रोहित पवारांना सूचना आहे की, त्यांनी आरोप करणं, भानगडी बंद कराव्यात. कुटुंबावर दुःखाचा आघात झाला आहे, त्यामध्ये राजकारण कशाला करता?” असा सवाल विचारत विखे पाटील यांनी रोहित पवारांवर टीका केली होती.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



