नाशिक: जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात सर्जन म्हणून कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने सीबीएस-मेहेर सिग्नल या रस्त्यावर सुसाट वाहन चालवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दुचाकी, रिक्षाला धढक देत तीन पादचाऱ्यांनाही उडविले. वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली असून अन्य दोघांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित डॉ. दिनेश सीताराम पवार यांना ताब्यात घेतले असून त्यापूर्वी नागरिकांनी त्यांना चोप दिला.
शहरातील अत्यंत महत्त्वाचा व मध्यवर्ती भागातील हा स्मार्ट रोड आहे. या रस्त्यावरून गुरुवारी (दि.१०) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आरोग्य विभागातील सरकारी सेवेत कार्यरत असलेले संशयित पवार यांनी त्यांच्या ताब्यातील कार (एमएच १५ जेएम ४५२५) बेदरकारपणे भरधाव चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सिटी लिंक बसथांबा येथे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कारने अगोदर दुचाकीला नंतर रिक्षाला (एमएच १५ जेए ८२९७) जोरदार धडक दिली. तसेच तीन पादचान्यांनाही धडक बसली. सुदैवाने ते बालंबाल बचावले, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
यावेळी सीबीएसकडून मेहेर सिग्नलकडे जाणारी वाहतूक खोळंबली. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील काही मिनिटांतच दाखल झाले. पवार
यांना तातडीने वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेले. पवार यांनी मद्यप्राशन केले होते, असा आरोप नागरिकांनी यावेळी केला. त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांचा चढला पारा
डॉ. पवार यांना काही तरुणांनी कारमधून खाली उत्तरविले, यावेळी त्यांचा तोल जात असल्याचे बघून नागरिकांचा पारा चढला अन् काही संतप्त तरुणांनी पवार यांना चोप दिला. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत नागरिकांनी त्यांना धरून ठेवले होते.
'इमर्जन्सी ड्यूटी, सिव्हिल हॉस्पिटल, कारवर पाटी
महाधुंद अवस्वेत सुसाट कार चालविणाऱ्या पवार यांनी कारख्या डॅशबोर्डवर 'इमर्जन्सी ड्यूटी, सिव्हिल हॉस्पिटल, सर्जन' असे इंग्रजीतून अक्षरे लिहिलेली पाटी लावलेली आढळून आली, नागरिकांनी त्यांच्या ओळखपत्रावरून ओळख पटविली. पवार हे शस्त्रक्रिया विभागात सर्जन पदावर कार्यरत असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




