
Pune : पुण्यातील खराडी भागात एका तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या पाच सराईत गुन्हेगारांना लातूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कडेकोट बंदोबस्तादरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, एका व्हॉट्सॲप फोटोमुळे या गुन्हेगारांची ओळख पटली आणि लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी पुण्याच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.
रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लातूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे 'चार्ली पथक' भांबरी चौक ते साई नाका रिंगरोड परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ अंधारात झाडाखाली पाच तरुण संशयास्पद रितीने बसलेले पोलिसांना आढळले. त्यांचे वय अवघे १८ ते २० वर्षे होते. पोलिसांनी हटकले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी पाचही जणांना ताब्यात घेतले.
|
|
ताब्यात घेतलेल्या तरुणांची सखोल चौकशी सुरू असतानाच, चार्ली पथकाने त्यांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत ग्रुपवर शेअर केले. अवघ्या काही मिनिटांतच पुणे पोलिसांकडून दुजोरा मिळाला की, हे पाचही तरुण २४ जानेवारी रोजी पुण्यातील वाघोली-खराडी भागात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहेत. त्यांच्यावर पुणे पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) अन्वये गंभीर गुन्हा दाखल आहे.
कैलास विठ्ठल राठोड (रा. खराडी, पुणे), गणेश चंद्रकांत कट्टे (रा. खराडी, पुणे), सुशील सुभाष कदम (रा. खराडी, पुणे), करण विठ्ठल तुरे (रा. चंदन नगर, पुणे), रोहित विकास गायकवाड (रा. नानापेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रात्री उशिरा १ वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईनंतर लातूर पोलिसांनी पाचही आरोपींना पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चवरे आणि त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई पूर्ण केली.
मित्राच्या घरी जमलो, गप्पा गोष्टी झाल्या आणि क्षुल्लक वादातून मित्रांनीच मित्राचा काटा काढल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या वाघोली परिसरात घडली होती. शनिवारी (२४ जानेवारी) रात्री उशिरा वाघोलीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये २१ वर्षीय तरुणाची त्याच्याच पाच मित्रांनी गळा चिरून निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा थरार घडला, त्याच्या समोरच गुन्हे शाखेचे कार्यालय असूनही आरोपींनी हे धाडस केल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
मृत विकी विजय दिवटे (वय २१, रा. चंदननगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत) आणि त्याचे पाच मित्र शनिवारी रात्री वाघोलीच्या बायफ रोडवरील 'आर.पी.एस. हेरिटेज' सोसायटीमध्ये आले होते. या सोसायटीच्या १० व्या मजल्यावर राहणारा मित्र प्रतीक मोरे याच्या फ्लॅटवर हे सर्वजण जमले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात मित्रांनी विकीवर चाकूने सपासप वार केले. त्याचा गळा चिरल्याने रक्ताच्या थारोळ्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
महाराष्ट्र
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल




























Subscribe to my channel





1 thought on “Pune : पुण्यात पाच मित्रांनीच विकीचा खून केला; लातूरला पळ काढला, पण एका चुकामुळे बिंग फुटलं आणि सगळे आरोपी पकडले गेले”