
Pune : साताऱ्यातील वाई येथून आठ दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या एका 27 वर्षीय तरुणाचा पुण्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील गजबजलेल्या कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पीयूष ओसवाल (रा. वाई, जि. सातारा) असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूमुळे ओसवाल कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्यातील लष्कर (कॅम्प) परिसरातील 'मुकेश लॉज'मध्ये ही खळबळजनक घटना उघडकीस आली. बुधवारी दुपारी लॉजमधील एका बंद खोलीतून अचानक उग्र आणि असह्य दुर्गंधी येऊ लागली. यामुळे लॉजवरील कर्मचारी आणि व्यवस्थापनाला संशय आला. कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीचा दरवाजा ठोठावला, आवाज दिला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लॉज प्रशासनाने तात्काळ बंडगार्डन पोलिसांना याची माहिती दिली.
|
|
माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, समोरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. पीयूष ओसवाल याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आपले जीवन संपवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची अवस्था पाहता आणि खोलीत पसरलेली दुर्गंधी लक्षात घेता, पीयूषने सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मूळचा वाईचा असलेला पीयूष ओसवाल हा गेल्या आठ दिवसांपासून घरातून निघून गेला होता. तो घरी न परतल्याने आणि त्याचा कोणताही संपर्क न झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी वाई पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. वाई पोलिसांनी तातडीने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला होता. एकीकडे वाई पोलीस आणि नातेवाईक त्याचा शोध घेत असतानाच, दुसरीकडे पुण्यात त्याचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पीयूष पुण्यात कधी आला? तो या लॉजवर कधीपासून थांबला होता? आणि त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वाई पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून, दोन्ही पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून पुढील तपास केला जात आहे. तरुण वयात पीयूषने उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे वाई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel





1 thought on “Pune : साताऱ्यातील 27 वर्षीय तरुण अचानक बेपत्ता; 8 दिवसांनी पुण्यातील लॉजमध्ये मृतदेह आढळला, दुर्गंधीमुळे प्रकार उघड”