
Pune Crime News : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीची दादागिरीची घटना समोर आली आहे. कोथरूडमध्ये गजा मारणेच्या टोळीने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचे काम करणाऱ्या तरूणाला बेदम मारहाण केली. कोथरूडमध्ये तरूणाला रस्त्यात गाठत लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. देवेंद्र पुरुषोत्तम जोग असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडीओ काँलवर देवेंद्र पुरुषोत्तम जोग यांची विचारपूस केली आहे. देवेंद्रला मारहाण करणारे सर्व आरोपी नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे.
कोथरूडमधील मारणे टोळीतील काही गुंडांनी पुण्यात कोथरूडमध्ये तरूणाला कोणतेही कारण नसताना भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. कोथरूड) असे टोळक्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौक येथे घडली.
|
Dadar News : मुंबईत 'उडता पंजाब'! दादरमधून ५ किलोचा ड्रग्ज जप्त, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोथरूडमधील मयूर कॉलनी येथे राहायला आहे. तो एका आयटी कंपनीत नोकरी करतो. शिवजयंतीच्या निमित्ताने बुधवारी कंपनीला सुटी होती. त्यामुळे तक्रारदार घरीच होता. दुपारी चारच्या सुमारास तक्रारदार वैयक्तिक कामानिमित्त दुचाकीवरून भेलकेनगर परिसरात गेला होता. तेथील काम करून तरूण पुन्हा घराकडे चालला असताना, भेलकेनगर चौकातून ‘मारणे टोळी’तील काही व्यक्तींनी काढलेली मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत मारणे टोळीचा प्रमुखही उपस्थित होता.
तरूण मिरवणुकीच्या समोरून दुचाकी घेऊन पुढे गेला. त्याचा राग आल्याने तीन ते चार जणांनी पळत जावून तक्रारदाराला थांबवले आणि शिवीगाळ केली. ‘गाडी हळू चालवता येत नाही का, धक्का का दिला’ असे म्हणून टोळक्याने तरुणाला मारहाण केली. एकाने तरुणाच्या नाकावर जोराने ठोसा मारला. त्यानंतर त्याला रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली. मारहाण करून टोळक्याने तेथून पळ काढला. तक्रारदाराने स्वत:ला सावरत वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि ते दोघे कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.
पोलिसांना घ्यावी लागेल कठोर भूमिका
कोथरूड परिसरात मोहोळ, मारणे, घायवळ अशा टोळ्या सक्रीय आहेत. या टोळ्यांमध्ये वर्चस्व वादातून चढाओढ सुरू असते. त्यातून काही घटना घडत असतात. मात्र, आता या टोळ्यांच्या दहशतीचा सामान्य नागरिक फटका बसत आहे. शहरात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
शहर
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!




























Subscribe to my channel



