Phugewadi Hooch Tragedy: 16 Deaths Confirmed, Yet Official Records Only Show 11

फुगेवाडी विषारी दारूकांड: प्रशासकीय नोंदीत केवळ ११, तर प्रत्यक्षात १६ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप

Phugewadi Hooch Tragedy: 16 Deaths Confirmed, Yet Official Records Only Show 11पिंपरी/पिंपळे गुरव: फुगेवाडीतील भीषण विषारी दारू प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे, मात्र आता या प्रकरणाने एक धक्कादायक वळण घेतले आहे. प्रशासनाच्या सरकारी नोंदी आणि प्रत्यक्ष मृतांचा आकडा यात मोठी तफावत दिसून येत आहे.

नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत या विषारी दारूच्या सेवनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांच्या आणि प्रशासकीय दप्तरी केवळ ११ जणांचीच मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित ५ जणांचे मृत्यू नोंदीबाहेर असल्याने आता या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक मृतांची नोंद प्रशासनाकडे नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह स्थानिक नागरिकांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर मृतांची खरी संख्या लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. विषारी दारूच्या या रॅकेटचे जाळे अत्यंत व्यापक असून, आतापर्यंत या प्रकरणात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून आकड्यांमध्ये केली जाणारी ही हेराफेरी मृतांच्या कुटुंबीयांसाठी अन्यायी ठरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खरी मृतांची संख्या जाहीर करावी आणि सर्व पीडित कुटुंबांना मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *