लातूर :देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता लातूरचे कनेक्शन उघड झाले आहे. लातूरमधील प्रसिद्ध 'रेणुका केमिस्ट्री क्लासेस' (RCC) चे संचालक आणि 'एम-सर' म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
सीबीआयने गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकला होता. शिवराज मोटेगावकर यांची सलग ११ तास कसून चौकशी केल्यानंतर सीबीआयच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. सीबीआयने जेव्हा त्यांच्या मोबाइलची तपासणी केली, तेव्हा त्यामध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या 'नीट' परीक्षेची अधिकृत प्रश्नपत्रिका सापडली. ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका (Answer Key) परीक्षा होण्यापूर्वीच त्यांच्याकडे आली होती, असा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.
मोठा रॅकेटचा पर्दाफाश:
तपासात असे समोर आले आहे की, मोटेगावकर हे एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. ते इतर आरोपींच्या संगनमताने परीक्षेचे गोपनीय साहित्य मिळवून ते पुढे काही निवडक व्यक्तींना वाटत असत. विशेष म्हणजे, ज्या शिक्षकाने २०२४ मध्ये पेपरफुटीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती, तोच शिक्षक आज स्वतः पेपरफुटीच्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार म्हणून अडकला असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
आणखी खुलासे:
या प्रकरणाचा तपास आता अधिक गडद होत असून, लातूरमधील डॉक्टर मनोज शिरूरे यांच्या फ्लॅटवर चालणारे 'विशेष क्लासेस' आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहार, तसेच मोटेगावकर यांच्या लपवलेल्या बँक लॉकर्समधील गुपिते उलगडण्यासाठी सीबीआय आणि ईडी (ED) कडून अधिक सखोल तपास केला जात आहे. या अटकेनंतर सोलापूर आणि इतर ठिकाणच्या 'आरसीसी'च्या शाखा अचानक बंद झाल्या असून, विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
शहर
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- मुंबई: २१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार ठरतील; डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात, जनतेची सत्ता हिरावण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप
- पुणे: पुण्यातील मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास दणका! मालमत्ताधारकांना १५ दिवसांची मुदत, महापालिकेचा कडक इशारा
- पुणे: दुर्गा टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा 'चिपको' एल्गार; पाण्याची टाकी दुसरीकडे उभारण्याची जोरदार मागणी!
महाराष्ट्र
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- मुंबई: २१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार ठरतील; डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात, जनतेची सत्ता हिरावण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप
- पुणे: पुण्यातील मोकळ्या जागांवर कचरा टाकल्यास दणका! मालमत्ताधारकांना १५ दिवसांची मुदत, महापालिकेचा कडक इशारा
- पुणे: दुर्गा टेकडीवरील २२७ वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा 'चिपको' एल्गार; पाण्याची टाकी दुसरीकडे उभारण्याची जोरदार मागणी!
गुन्हा
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




