
नाशिक : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटात राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेण्यावरून नाशिकमध्ये मोठा 'राडा' निर्माण झाला होता. अजित पवार आणि छगन भुजबळ समर्थकांनी राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेत शरद पवार गटाला कार्यालयात प्रवेश नाकारल्याने शरद पवार गटाच्या कार्यालयाचे काय होणार? असा प्रश्न नाशिककरांना पडला असतांना मुंबई नाका येथेच या गटाने एका रात्रीत शरद पवार गटाचे दुसरे कार्यालय उभारले आहे.
एकीकडे महाराष्ट्राचं राजकारणअस्थिर असून काका पुतण्यामध्ये अद्यापही काही सुरु आहे का? अशी चर्चा सुरु आहे. दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी दुफळी निर्माण झालीच आहे. नाशिकमध्ये तर या दुफळीचा जोरदार राडा पाहायला मिळाला होता. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी भवन कोणाकडे जाणार यावरून वाद रंगला होता. तो थेट शरद पवारांपर्यंत जाऊन पोहचला होता. अशातच शरद पवार समर्थकांनी आता पक्षाचे अधिकृत असलेले तीन मजले हायटेक कार्यालय मिळत नसल्याचे बघून 100 मीटर अंतरावर असलेल्या एका भूखंडावर तंबू ठोकत नवीन कार्यालयाचा डेरा उभारला आहे.
राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने सरकारमध्ये सामील होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर महाराष्ट्रासह नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीवरून जोरदार कलगीतुरा रंगला. त्यातच शरद पवार येवला सभा दौऱ्यावर असताना नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयावरून राडा झाला. त्यानंतर मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या कार्यालयाचा ताबा अजित पवार गटाकडे गेला. दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने अनर्थ टळला तर कार्यकर्त्यांना शांत करण्यास पोलिसांना यश आले. दरम्यान, भुजबळ गटाने राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेतल्यापासून या कार्यालयात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना एन्ट्री नसल्याने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका खासगी ठिकाणीच होत होत्या. आता शरद पवार गटाने आगामी निवडणुका लक्षात घेत पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी नवीन कार्यालयाचा तंबू ठोकला आहे.
|
|
पक्षाचा विस्तार करण्यावर भर
नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, अजित पवार यांनी समर्थकांना आमदारपदी संधी देत राजकीय वर्चस्व वाढवले. पक्षाचे हायटेक कार्यालय अजित पवार यांच्याकडे गटाकडे गेल्यानंतर तंबू ठोकून तेथे शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामकाज करणार आहेत. त्यामागील सहानुभूतीचे राजकारणही चर्चेत आले आहे. पक्षाचे जुने कार्यालय हे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नावे असून पोलिसांच्या मदतीने अजित पवार यांचे समर्थक तेथे काम करत आहेत. त्यांच्याकडे सर्व मॅनेज पदाधिकारी तर आमच्याकडे निष्ठावंत शरद पवार समर्थक आहेत. तंबूत कार्यालय बनवूनदेखील पक्षाचा विस्तार करू असा विश्वास शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केला आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




