
Nashik : स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी खरातने वापरलेल्या कथित ‘गूढ औषधा’बाबत तपास यंत्रणांनी गंभीर चौकशी सुरू केली आहे. या औषधामध्ये नेमके कोणते रसायन मिसळले होते, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्यावर अनेक महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत. यासंदर्भात जवळपास 56 व्हिडीओ समोर आले असून, त्याच्याविरोधात 11 तक्रारी नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथक (SIT) करत आहे.
प्रसादा’मागचं गूढ काय?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात आपल्या केबिनमध्ये येणाऱ्या महिलांना खारट किंवा कडवट चवीचे द्रव औषध देत असे. त्यासोबत तो विशेष पेढेही खायला लावत होता. हे पदार्थ सेवन केल्यानंतर महिलांना काही वेळातच मळमळ, डोके गरगरणे, जडपणा आणि गुंगी येत असल्याचे समोर आले आहे.
या अर्धबेशुद्ध अवस्थेचा फायदा घेत, केबिनमधील दिवे बंद करून खरात महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा SIT चा प्राथमिक निष्कर्ष आहे. या ‘प्रसादा’मुळे पीडित महिलांना त्याच्या सांगण्याप्रमाणे वागण्यास भाग पाडले जात होते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
औषधात नेमकं काय?
या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्या द्रव पदार्थात आणि पेढ्यांमध्ये नेमके काय मिसळले होते? हे कोणत्या प्रकारचे गुंगी आणणारे रसायन होते? याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितले की, अशोक खरात तपासात सहकार्य करत नाही. या ‘गूढ औषधा’बाबत तो माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळेच SIT ने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.
पुढील कारवाई
काल न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर, अशोक खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, या ‘विषारी’ पेढ्यांचा आणि संशयित द्रव पदार्थाचा स्त्रोत शोधण्यासाठी SIT कडून तपास वेगाने सुरू आहे. येत्या काही दिवसांत या गूढ औषधामागील सत्य समोर येते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



