
Pune : पुणे शहर जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार आणि कृत्रिम टंचाई होत असल्याच्या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. घरगुती गॅसचे वितरण आता ‘ओटीपी’ प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून, नोंदणी केल्यानंतर अवघ्या ९६ तासांच्या आत घरपोच सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे वितरकांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्याची गरज नाही. त्याबाबत घरपोच सिलिंडर देण्याची गॅस वितरकांवर सक्ती करण्यात आली आहे.
पोलिस संरक्षण देण्याचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस वितरक कंपन्याचे प्रतिनिधी, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, तसेच पोलिस अधिकारी यांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, तसेच विविध प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी गॅस वितरकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्या वेळी वितरकांसह कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस वितरकांना पोलिस सरंक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा केवळ ‘ओटीपी’ प्रणालीद्वारेच करण्यात यावा. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलिंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तेल कंपन्यांसह वितरकांना दिल्या आहेत. त्याशिवाय सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर ‘गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपी’द्वारेच ९६ तासांच्या आत घरपोच करण्यात येईल,’ असा आशय दर्शविणारे फलक लावावेत. त्याबाबत ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमाकांवर त्या संदर्भातील संदेशही पाठवावा. त्यामुळे गॅस एजन्सीच्या दुकानासमोर गर्दी करू नये, असा संदेश पाठविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
"घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत घरपोच वितरण करणे वितरकांवर बंधनकारक राहील, नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलिंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच गॅस एजन्सीनी कोणताही अवैध व्यापार होणार नाही यासाठी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे. बेकायदा गॅसचा पुरवठा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल," अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
तेल कंपन्यांना सूचना
दैनंदिन गॅस रिफिलिंगची क्षमता वाढविण्याचे गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आदेश
कंपनीच्या स्तरावरून गॅस वितरकांसाठी ज्या काही सूचना असतील त्या सर्व वितरकांना लेखी कळविण्याबाबत आदेश द्यावेत
दुसरे गॅस सिलिंडर वाटपाच्या कालवाधीचे निकष महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीत गॅस एजन्सीना २५ दिवस, ग्रामीण भागांत एजन्सींना ४५ दिवस करावेत.
औद्योगिकीकरण झालेल्या हिंजवडी भागात हा निकष २५ दिवसांचा करावा.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना
गॅस सिलिंडरच्या वितरणात कोणीही अडथळे, हस्तक्षेप केल्यास तक्रारीनुसार कारवाई करावी.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने वेळोवेळी योग्य तो बंदोबस्त देण्यात यावा.
गॅस एजन्सीधारकांनी वितरणाबाबत मागणी केल्यास नियमानुसार पोलिस संरक्षण द्यावे.
अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी वेळोवेळी गॅस एजन्सी व गोदामाच्या ठिकाणी पोलिसांनी भेटी द्याव्यात.
पुणे जिल्ह्यातील सिलिंडर ग्राहक
१६,००,००० हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल)
२०, २३, ८०० भारत पेट्रोलियम (बीपीसीएल)
२, १२, ३५६ इंडियन ऑइल (आयओसी)
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




