म्हैसूर:कर्नाटकच्या जागतिक प्रसिद्ध 'म्हैसूर दसरा' (Mysuru Dasara) महोत्सवात ७५० किलो वजनाची सोन्याची अंबाडी (Golden Howdah) पाठीवर वाहून 'जंबो सवारी'चे नेतृत्व करणाऱ्या प्रसिद्ध गजराज 'अभिमन्यू' (Abhimanyu Elephant) चा डाव्या बाजूचा सुळा (Tusk) तुटल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ६० वर्षांच्या या दिग्गज हत्तीचा सुळा तुटल्याचे समजताच वन्यजीवप्रेमी आणि भाविकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या वन खात्याचे पशुवैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवून असून आवश्यक ते उपचार सुरू करण्यात आले आहेत.
लाकडी ओंडके वाहताना किंवा 'मस्त' अवस्थेत झाली दुर्घटना
अभिमन्यूच्या या दुर्घटनेबाबत दोन वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. नागराहोळे व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या माथीगोडू हत्ती कॅम्पमध्ये (Mathigodu Elephant Camp) लाकडी ओंडके वाहून नेण्याचे काम करत असताना अचानक वजन न पेलवल्याने किंवा तोल गेल्याने त्याचा डावा सुळा मधोमध तुटला. दुसरीकडे, तो 'मस्त' (Musth - हत्तीच्या शरीरातील हार्मोन्स वाढण्याची अवस्था) मध्ये असताना त्याने एका झाडावर सुळा घासल्यामुळे त्याचा पुढचा भाग तुटल्याचेही सांगितले जात आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
'एके-४७' आणि कॉम्बिंग स्पेशलिस्ट म्हणून ओळख
अभिमन्यू हा केवळ दसरा महोत्सवाचाच मानकरी नाही, तर वन विभागाचा सर्वात पराक्रमी आणि 'मिस्टर रिलायबल' हत्ती मानला जातो. त्याने आतापर्यंत ३०० हून अधिक जंगली हत्ती आणि ८० पेक्षा जास्त वाघांना पकडण्याच्या अत्यंत धोकादायक मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले आहे. त्याच्या याच अफाट ताकदीमुळे आणि धाडसामुळे वन विभागात त्याला 'एके-४७' (AK-47) किंवा 'कॉम्बिंग स्पेशलिस्ट' या टोपणनावाने ओळखले जाते.
दसऱ्याच्या कामगिरीवर परिणाम नाही; हत्ती पूर्णपणे सुदृढ
वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुळा तुटल्यामुळे अभिमन्यूच्या आरोग्यावर किंवा त्याच्या कामगिरीवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. हत्तींमध्ये वयोमानानुसार सुळे कमकुवत होणे किंवा तुटणे ही नैसर्गिक बाब आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून सध्या तो बांदीपूर परिसराजवळ एका वाघाला जेरबंद करण्याच्या मोहिमेत सक्रिय आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी म्हैसूर दसऱ्यात तो नेहमीप्रमाणेच सोन्याची अंबाडी वाहण्याची आपली मुख्य जबाबदारी पार पाडेल, फक्त या वेळी तो एका नवीन रुपात (New Look) पाहायला मिळेल.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




