
Mumbai :मुंबईतील माटुंगा परिसरात मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या डब्यांना मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात मोठी घबराट पसरली. काही वेळातच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या मध्य रेल्वेच्या कोच रिपेअर वर्कशॉपमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी रेल्वेच्या डब्यांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. प्राथमिक माहितीनुसार, वर्कशॉपच्या आवारात उभ्या असलेल्या एसी कोचमध्ये उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीच्या ज्वाला वेगाने पसरल्याने आणि मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. मुंबई अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आग इतर डब्यांपर्यंत पसरू नये यासाठी तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून वर्कशॉप परिसर रिकामा करण्यात आला. वैद्यकीय पथकही घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.
या घटनेचा लोकल रेल्वे सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने माटुंगा स्थानक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.
याआधीही मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील यार्डात उभ्या असलेल्या कचरा वाहतूक करणाऱ्या लोकल ट्रेनच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली होती. गेल्या काही काळात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




