
Pune : ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइटवर निर्माण झालेल्या ओळखीचे किती धोकादायक वळण घेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. हडपसर परिसरात ४२ वर्षीय महिला, जिला इंदोरहून पुण्यात प्रेमात पडल्याच्या बहाण्याने आणले गेले, फसवणुकीचा शिकार झाली आहे. आरोपी प्रशांत प्रकाश चव्हाण (वय ४२, रा. फुरसुंगी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध वेगाने सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेची ओळख मॅट्रिमोनियल साइटवरून आरोपीशी झाली होती. सुरुवातीला गोड बोलणे, काळजी घेण्याचा भास देणे आणि भविष्याबाबत मोठमोठी स्वप्नं दाखवून आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. “आपण लग्न करू” असे ठाम आश्वासन देत त्याने तिला पुण्यात येण्यास प्रवृत्त केले.
आरोपीने महिलेला नोकरीचे आश्वासन दिले आणि इंदोरमधील तिचा जॉब सोडून ती पुण्यात आली. येथे चव्हाणने तिला स्वतःच्या हॉटेलमध्ये कामाला लावले आणि त्याच हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. चार ते पाच महिने महिलेने तिथे राहून काम केले. या दरम्यान, अनेकदा तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिला मानसिक दबावाखाली ठेवले आणि गैरफायदा घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हॉटेलमध्ये काम करत असताना पगाराच्या मुद्यावरून वाद झाला. तरीही आरोपी वेळोवेळी “लग्न करू” असे आश्वासन देत राहिला. काही दिवसांपूर्वी त्याने अचानक लग्नास नकार दिला आणि महिलेपासून दूर राहू लागला. तेव्हा पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मानसिक धक्क्यात आलेल्या महिलेने अखेर हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून लवकरच त्याला अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइट्सवरील फसवणुकीचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा समोर आले आहे. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये, वैयक्तिक माहिती देताना सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




