पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मनमानी कारभाराविरोधात, परीक्षांमधील घोळ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात येत्या २ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेले मोठे 'सत्याग्रह' आंदोलन अखेर तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळादरम्यान मंत्रालयात पार पडलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत विद्यार्थ्यांच्या बहुतांश प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत अनेक ठोस व दिलासादायक आश्वासने दिल्यानंतर, विद्यार्थी प्रतिनिधींनी हे आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक बैठक: गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी राज्यभरातून आवाज उठवत होते. याच पार्श्वभूमीवर पुण्यात २ ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन शासनाकडून खालीलप्रमाणे महत्त्वाचे निर्णय व आश्वासने देण्यात आली:
-
सचिवांची तडकाफडकी बदली: एमपीएससीच्या सचिवांची लवकरच तडकाफडकी बदली करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
-
अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी: एमपीएससी अध्यक्षांच्या कारभारासंदर्भात संविधानाच्या कलम ३१७ नुसार आणि त्रयस्थ न्यायाधीशांमार्फत ३ महिन्यांत चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
-
परीक्षा ऑफलाईनच होणार: विद्यार्थ्यांची मुख्य मागणी असलेल्या परीक्षांच्या पद्धतीबाबत स्पष्ट करण्यात आले की, आगामी सर्व एमपीएससी परीक्षा या पूर्वीप्रमाणेच 'ऑफलाईन' पद्धतीनेच घेतल्या जातील. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय यात कोणताही बदल केला जाणार नाही.
-
विक्रमी जागांची भरती: आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील इतक्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा भरण्यात येतील. तसेच ३ जानेवारीच्या गट 'क' परीक्षेच्या अनुषंगाने जागावाढीची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे.
-
एकल कार्ड प्रणाली (Single Card System): विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एकाच 'सिंगल कार्ड'वर सर्व प्रकारच्या परीक्षा देता येतील अशी अद्यावत आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्यात येणार असून, ती अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल. वारंवार कागदपत्रे जोडण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे.
-
तीन वर्षांच्या जागा एकाच वेळी जाहीर: यापुढे पुढील ३ वर्षांच्या रिक्त जागांचे नियोजन एकाच वेळी जाहीर केले जाईल आणि सेवानिवृत्त होणाऱ्या जागांवर एक वर्ष आधीच भरती प्रक्रियेची तयारी सुरू केली जाईल.
विद्यार्थ्यांकडून आंदोलन स्थगितीची घोषणा: मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या सर्व ठोस आणि सकारात्मक आश्वासनांमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थी प्रतिनिधी नितीन अंधळे आणि इतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक अत्यंत सकारात्मक झाल्याचे जाहीर करत, येत्या २ ऑक्टोबर रोजी पुण्यात नियोजित केलेले सत्याग्रह आंदोलन तूर्त तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा केली.
शहर
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच! शहरात पिशव्यांचे ढीग साचल्याने नाले तुंबण्याच्या प्रमाणात मोठी वाढ
- मुंबई: मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
महाराष्ट्र
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
- गोवा: आम्हाला देखाव्याची कामे नकोत, तर शाश्वत विकास हवा आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




