
Crime News : मध्य प्रदेशामधील इंदौर शहरात मुस्लिम मुलीसोबत फिरणाऱ्या एका हिंदू मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या लोकांवर आरोपींनी चाकूने हल्ला केला. पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी या घटनेची माहिती दिली आहे. मध्यप्रदेशातील इंदौरमधील एका हॉटेलमधून बाहेर पडताना एका हिंदू मुलाला आणि मुस्लिम तरुणीला मारहाण करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. तरुणीला वाचवण्यासाठी आलेल्या दोघांवरही चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 20 लोकांच्या प्रचंड गर्दीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.
इंदौरचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त राजेश रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गुरुवारी रात्री एक हिंदू मुलगा आणि एक मुस्लिम मुलगी एका हॉटेलमध्ये जेवत होते. हॉटेलमधून बाहेर पडत असताना काही मुस्लिम लोकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले आणि या लोकांनी मुलीला हिंदू मुलासोबत फिरण्याबाबत हरकत घेतली आणि ती हिंदू मुलासोबत का फिरते असे तिला विचारले. तर या लोकांनी मुलालाही मारहाण केली.
अतिरिक्त डीसीपीने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने सांगितले की, ती तिच्या पालकांना सांगून हिंदू तरुणासोबत जेवायला गेली होती. उपस्थित जनसमुदाय ज्या प्रकारे वागला. त्यावरही मुलीने आक्षेप घेतला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
हे संपूर्ण प्रकरण शहरातील तुकोगंज पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. संध्याकाळी उशिरा एक मुस्लिम मुलगी तिच्या हिंदू मित्रासोबत जेवण करून हॉटेलमधून निघाली, तेव्हा त्या दोघांना काही मुस्लिम मुलांनी घेरले. त्यांनी मुलीला बुरखा घालून घरी राहण्यास सांगितले. या मुलांनी मुलीला इस्लाम धर्माबाबत अनेक प्रकारचे सल्लेही दिले. हिंदू मुलाने त्यांना विरोध केला असता या तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली.
सीएम शिवराज यांचे कडक कारवाईचे आदेश
तुकोगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी कमलेश शर्मा यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींची ओळख पटली आहे. तर 23-26 वर्षे वयोगटातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिस तपास करत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या संपूर्ण प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




