मुंबईतील कुरार पोलिसांनी बांगडी पॉलिशसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲसिडचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी दोन कारखान्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ३६० लिटर ॲसिडने भरलेले १२ कॅन जप्त करण्यात आले असून, मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी दोन कारखान्यांच्या मालक आणि व्यवस्थापकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुरार पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही कारखान्यांमध्ये विनापरवाना व अत्यंत धोकादायक रीतीने ॲसिडचा साठा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांच्या पथकाने जिजामाता शाळेजवळील 'पद्मावती केमिकल्स' आणि 'ओम ट्रेडर्स' या दोन्ही आस्थापनांवर अचानक छापा टाकला.
कारवाईदरम्यान दोन्ही ठिकाणी ॲसिडने भरलेले प्लास्टिकचे कॅन मोठ्या प्रमाणावर आढळून आले. विशेष म्हणजे, याच दाट लोकवस्तीच्या परिसरातील कारखान्यांमध्ये कामगारांकडून बांगडी पॉलिशचे काम सुरू असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासादरम्यान पोलिसांनी एका कॅनचे झाकण उघडून पाहिले असता, त्यातून अत्यंत उग्र दर्प आणि विषारी वाफा बाहेर पडत असल्याचे दिसून आले. मानवी वस्तीच्या ठिकाणी अशा प्रकारे कोणत्याही सुरक्षेेशिवाय आणि अधिकृत परवान्याशिवाय ज्वलनशील व घातक पदार्थाची साठवणूक करण्यात आली होती.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत कारखाना व्यवस्थापकांकडे ॲसिड साठवणुकीसाठी आवश्यक असणारा कायदेशीर परवाना मागितला, परंतु त्यांच्याकडे कोणտही वैध कागदपत्रे किंवा परवानग्या उपलब्ध नव्हत्या. या कारवाईत पोलिसांनी 'पद्मावती केमिकल्स'मधून ३० लिटर क्षमतेचे आठ कॅन, तर 'ओम ट्रेडर्स'मधून ३० लिटर क्षमतेचे चार कॅन जप्त केले. एकूण १२ कॅनमध्ये आढळलेले सुमारे ३६० लिटर ॲसिड जप्त करण्यात आले असून, या मुद्द्यामाळाची किंमत अंदाजे १८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी 'पद्मावती केमिकल्स'चा व्यवस्थापक महिपालसिंग विक्रमसिंग व मालक गंगासिंग बलावत, तसेच 'ओम ट्रेडर्स'चा व्यवस्थापक नरेंद्र पटेल व मालक भिकाराम पटेल यांच्याविरोधात कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवी जीवितास आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना घातक रसायने बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या रसायनांच्या पुरवठ्यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास कुरार पोलिसांकडून सुरू आहे.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




