Ganesh Visarjan 2022 : गणपती विसर्जन मिरवणुकीत कलावंतांच्या ढोल-ताशांचा गजर

पुणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांचा सडा, रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अन मोठ्या उत्साहात सुरू होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अवघ्या महाराष्ट्रात दोन वर्षांनंतर मोठया धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा झाला. आज गणरायाला निरोप देण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी जमली आहे. पुण्यात मानाच्या गणपतीसह इतर मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची धुमधडाक्यात तयारी केली आहे. विशेष म्हणजे मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीत कलाकारांचे कलावंत ढोल ताशा पथक सहभागी झाले आहे.

यामध्ये अभिनेता सौरभ गोखले, सिध्दार्थ जाधव, आस्ताद काळे, केतन क्षीरसागर, तेजस बर्वे तर अभिनेत्री अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, श्रृती मराठे, स्वप्नाली पाटिल, नुपूर दैठणकर, शाश्वती पिंपळीकर, नीता दोंदे सहभागी झाले आहेत. या सर्व कलाकारांच्या ढोल-ताशांचा गजर पुणेकरांन ऐकायला मिळणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *