Fire Breakout In Andheri East Building : साकीनाका परिसरातील इमारतीला आग,सुदैवाने जीवितहानी नाही

Mumbai News : मुंबईत आगीच्या दुर्घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरात आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. 

साकीनाका परिसरातील 90 फूट रस्त्यावरील साकी सीएचएस, डिसूझा कंपाउंड इमारतीच्या मीटर बॉक्स केबिनला आग लागली. मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Phone Taping Case : IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा; फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द

ही आग लागली तेव्हा इमारतीत 40 ते 50 नागरिक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व नागरिकांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढले. या आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *