
Pune : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपली भूमिका ठाम करत उमेदवाराच्या माध्यमातून थेट लढतीचे संकेत दिले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या भोवती ही निवडणूक केंद्रीत होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ५३ वरून ४७ वर आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यापूर्वी 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते. मात्र, आज विलास बाबुराव होळकर, माऊली जमादार कांबळे, रझाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, राहुल बाळासो थोरात, अमोल यशवंत कोकरे आणि अशोक रामचंद्र खामगळ यांनी आपले अर्ज मागे घेतले. हे सर्व उमेदवार अपक्ष असल्याची माहिती आहे. उर्वरित उमेदवारांमध्येही काही जण माघार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अंतिम लढतीचे स्पष्ट चित्र उद्या दुपारपर्यंत समोर येण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या उमेदवारामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात थेट सामना उभा राहण्याची चिन्हे आहेत. बारामतीसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असल्याने ही लढत अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे. काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान उभे केलेले उमेदवार आकाश मोरे हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात 4013 मते मिळवली होती. त्यानंतर मात्र काँग्रेस बारामतीमध्ये कुठेच दिसली नाही.
12 वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीमध्ये आपली ताकद आजमावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटनात्मक ताकद कितपत प्रभावी ठरते, याकडेही लक्ष लागले आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात असली तरी आता ती पूर्णतः मावळली आहे. बारामतीत चुरशीची आणि बहुपक्षीय लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




