
Mumbai : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत सोमवारी मोठा गदारोळ झाला. ‘या प्रकरणातील कोणालाही ‘क्लीन चिट’ दिली जाणार नाही, तसेच दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही’, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवाय या संपूर्ण प्रकरणावर आज, मंगळवारी सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थगन प्रस्तावाद्वारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. अशोक खरात याच्याशी संबंधित १००हून अधिक ‘व्हिडीओ क्लिप’ समोर आल्याचा दावा त्यांनी केला. या क्लिपमध्ये राजकीय व्यक्ती, ‘आयएएस’, ‘आयपीएस’ तसेच महसूल विभागातील अधिकार्यांचा सहभाग असल्याचा आरोप करत संबंधित सर्वांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) तपासण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर आमदार भास्कर जाधव आणि नाना पटोले यांनीही सरकारवर जोरदार टीका करत या प्रकरणामुळे राज्याची बदनामी झाल्याचे सांगितले. ‘हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असून, यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे’, अशी मागणी विरोधकांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात हस्तक्षेप करत हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. आध्यात्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार, दुष्कृत्ये झाल्याचे समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी सक्रियपणे कारवाई सुरू केली असून, सुरुवातीला तक्रार देण्यास घाबरणाऱ्या महिलांना धीर दिल्यानंतर आता त्या पुढे येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ही कारवाई अचानक झालेली नसून आधीपासूनच तयारी सुरू होती. आरोपीच्या अटकेपूर्वीच १० मार्च रोजी दुसर्या जिल्ह्यातील एका तक्रारीचा वापर करून आवश्यक ती ‘एलओसी’ मिळविण्यात आली होती. त्यामुळे त्याला बाहेर पळता आले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे याबाबतची सविस्तर माहिती आज, मंगळवारी सभागृहासमोर मांडण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
‘माझ्यात वेगळी शक्ती आहे’, असे महिलांना सांगून त्यांचा दुरुपयोग करणे आणि त्या जे काही समर्पण करत आहेत, तेच त्यांचे इतिकर्तव्य आहे, अशा पद्धतीने त्यांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करणे, अशा अनेक गोष्टी यामध्ये झाल्या आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. मात्र, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिल्यानंतरच पुढील कामकाज सुरू झाले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




