मुंबई: राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या जारमधील (Jar Water) आणि बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कडक वचक असणार आहे. राज्यात जार व खुल्या पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणींची कबुली सरकारने विधानसभेत दिली आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना जार आणि बाटलीबंद पाण्याच्या पुरवठ्यासाठी विशेष नियमावली म्हणजेच 'एसओपी' (SOP - Standard Operating Procedure) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.
३ वर्षांत २० पाण्याचे नमुने आढळले थेट 'असुरक्षित'
विधानसभेत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या ३ वर्षांत (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६) एफडीएने (FDA) पाण्याच्या उत्पादक कंपन्यांवर १८२ वेळा छापे टाकून तपासणी केली. प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेल्या १७७ नमुन्यांपैकी ११५ नमुने प्रमाणित आढळले. मात्र, १३ नमुने कमी दर्जाचे, ४ नमुने दिशाभूल करणारे (मिथ्याछाप) आणि तब्बल २० नमुने मानवी आरोग्यासाठी थेट 'असुरक्षित' आढळले आहेत. जारच्या पाण्याचा थेट आरोग्याशी संबंध असल्याने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे बनले आहे.
हॉटेल्सना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' या मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. नवीन नियमांनुसार, राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांसाठी पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेल्सनी ग्राहकांसाठी "येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल" अशा आशयाचा स्पष्ट फलक (बोर्ड) दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. हॉटेलमध्ये आल्या आल्या ग्राहकांसमोर थेट विकतच्या पाण्याच्या बाटल्या ठेवता येणार नाहीत; जर ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाणी मागितले, तरच ते त्याला दिले जावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक; नियम मोडल्यास कडक कारवाई
अशुद्ध किंवा दूषित पाण्याच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांना थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवता यावी, यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी हॉटेल चालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे की, "जर नियमांचे पालन केले, तर कुणीही विनाकारण कारवाई करणार नाही, परंतु ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करून नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही." आयुक्त मुंढे यांच्याकडून लवकरच लागू होणाऱ्या या नवीन 'एसओपी'मुळे राज्यातील पाण्याचे जार आणि अन्न प्रक्रियेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




