जर तुम्ही गुगलवर सर्च करणार नाही असे वचन दिले, तरमी तुम्हाला तीन प्रश्न विचारू इच्छितो. पहिला प्रश्न : मोदीसरकारमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या आधी किती मुख्यनिवडणूक आयुक्त (सीईसी) झाले आहेत? दुसरा : तुम्हीत्यापैकी कुणाचे नाव सांगू शकता का? तिसरा : 1950पासून आतापर्यंत किती सीईसी झाले आहेत? पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे : आठ. भाजपच्या एकाप्रवक्त्यानुसार, या आठ सीईसींच्या कार्यकाळात भाजप 20निवडणुका हरली आणि 2024 च्या लोकसभेत 240जागांवरच मर्यादित राहिली. तुम्हाला आठवत असेल की,1990 च्या दशकात टी. एन. शेषन यांनी निवडणूकआयोगाचा कसा कायापालट केला होता. माजी सीईसीएस.वाय.कुरेशी हेदेखील नागरी समाजाच्या सार्वजनिकचर्चांमध्ये सक्रिय असतात आणि कदाचित तुम्हालामनोहरसिंग गिल यांचीही आठवण असेल. त्यांनी 1993-95दरम्यान सहकारी निवडणूक आयुक्त जी. व्ही. जी.कृष्णमूर्ती यांच्यासोबत मिळून शेषन यांचा सामना केलाहोता. तसेच, तिन्ही निवडणूक आयुक्तांचा दर्जा समानअसतो, हा सिद्धांत प्रस्थापित करण्यात ते यशस्वी ठरलेहोते. कदाचित तुम्हाला हेही आठवत असेल की,मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात गिल यांची राज्यमंत्रीम्हणून नियुक्ती झाली होती.गेल्या सुमारे 50 वर्षांपासून देशाचेराजकारण आणि निवडणुकांचे वार्तांकन करूनही, मलासर्व सीईसींपैकी काहींचीच नावे आठवतात. सर्वांत आधीमी ज्या सीईसींशी बोललो होतो, ते म्हणजे आर. के. त्रिवेदी.ते 18 जून 1982 ते 31 डिसेंबर 1985 या काळात या पदावरहोते. त्यांच्याशी बोलण्याची संधी तेव्हा मिळाली होती,जेव्हा आसाममध्ये जनतेचा बहिष्कार असतानाही इंदिरागांधींनी बळजबरीने निवडणुका घेतल्या होत्या. त्यात सुमारे7,000 लोक मारले गेले होते. मी त्रिवेदींना विचारले होते की, अशा प्रकारे बळजबरीने निवडणुका घेण्याची काय गरजहोती? त्यांचे थोडक्यात उत्तर होते : मला प्रॅक्टिकल बनावे लागेल. त्यांचे हे उत्तर बरेच चर्चेत आले होते. ज्ञानेश कुमार हे गेल्या 26 मुख्य निवडणूक आयुक्तांमध्ये सर्वांत जास्त लक्षात राहणारे दुसरे सीईसी बनले आहेत. साहजिकच, अशी ‘प्रसिद्धी’ त्यांना नक्कीच नको असेल.पण आता ते यातून मुक्त होऊ शकत नाहीत. सरकारही त्यांच्यापासून हात झटकू शकत नाही. तसे, संकेत तर हेचदिसत आहेत.ज्ञानेश कुमार आज अशा व्यक्तींमध्ये सामील आहेत, ज्यांना सर्वोच्च पदावर असल्यामुळे सर्वांत जास्त घटनात्मक संरक्षण प्राप्त आहे. त्यांना त्यांच्या पदावरूनकुणीही हटवू शकत नाही. 2023 मध्ये बनलेल्या नव्या कायद्यानुसार, सीईसी म्हणून केलेल्या त्यांच्या कोणत्याही कामासाठी त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकत नाही. विरोधक धमकी तर देऊ शकतात, पण त्यांच्यावरमहाभियोग चालवून त्यांना हटवण्याचे बहुमत विरोधकांकडे नाही. जर सरकारने त्यांना पदावरून हटण्यासाठी ‘राजी’केले, तर त्याचे मोठे राजकीय परिणाम होऊ शकतात.कारण, पुढे अनेक निवडणुका होणार आहेत आणि 2029च्या उन्हाळ्यात मोठी निवडणूक होणार आहे. ते 26जानेवारी 2029 पर्यंत, म्हणजेच त्यांचा कार्यकाळ पूर्णहोईपर्यंत पदावर राहू शकतात. म्हणजेच अजून 27महिन्यांचा वेळ आहे. सरकारवर ही वेळ अशा वळणावर आली आहे, ज्याचासामना भारतातील सरकारांना त्यांच्या कार्यकाळाच्यातिसऱ्या वर्षात करावा लागतो. हा काळ बहुधा त्यांच्यासाठीअडचणीचा ठरत आलेला आहे. साठ वर्षांपूर्वी, 1966 मध्येजेव्हा इंदिरा युगाची सुरुवात झाली होती, तेव्हापासून पाहिलेतर प्रत्येक सरकार कार्यकाळाच्या तिसऱ्या वर्षात थकलेलेआणि भरकटलेले दिसले आहे. जे आपल्या राजकारणातनावीन्य आणू शकले, तेच या जाळ्यात अडकण्यापासूनवाचू शकले आहेत. इंदिरा गांधींनी 1969 मध्ये आपला पक्ष फोडून, डाव्याविचारसरणीकडे वळून आणि सीपीआयच्या रूपाने आपलावैचारिक मित्र शोधून हे साध्य केले होते. 1971 मध्ये त्याप्रचंड बहुमत मिळवण्यात यशस्वी ठरल्या, पण 1974उजाडेपर्यंत त्यांच्या पतनाला सुरुवात झाली. 1980 मध्येपुनरागमन करूनही, 1983 मध्ये त्यांचे सरकार दिशाहीनझाले. त्यांच्या हत्येनंतर राजीव गांधी प्रचंड बहुमतानेनिवडणूक जिंकले. कारण इंदिरा गांधींनी ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ करून देशात आणि विशेषतः हिंदी पट्ट्यात एकराष्ट्रवादी भावना जागृत केली होती. 545 जागांच्यालोकसभेत 415 जागा जिंकूनही 1987 उजाडेपर्यंत राजीवगांधी दिशा भरकटले आणि नंतर कधीही सावरू शकलेनाहीत. नरसिंह राव यांच्या बाबतीतही हेच घडले. 1991मध्ये आर्थिक सुधारणांसह त्यांनी उत्साहवर्धक सुरुवातकेली. मात्र 1993 मध्ये त्यांचे सरकार अयोध्या प्रकरण आणिअर्जुनसिंग यांच्या बंडखोरीमुळे अडखळू लागले. प्रश्नअसा आहे की, मोदी आपल्या पहिल्या दोन कार्यकाळात यातिसऱ्या वर्षाच्या अडथळ्यापासून कसे वाचले? पहिल्याकार्यकाळात उरी/सर्जिकल स्ट्राइक आणिपुलवामा/बालाकोटमुळे लाटच बदलून गेली. दुसऱ्याकार्यकाळात त्यांना अशी नाट्यमय संधी मिळाली नाहीआणि अखेरीस 2024 मध्ये ते स्पष्ट बहुमत मिळवण्यापासूनवंचित राहिले. आता त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचे हे तिसरेवर्ष आहे. फुटबॉल किंवा हॉकीचे उदाहरण दिले, तर असे म्हणतायेईल की यात जे प्रशिक्षक असतात, त्यांना माहीत असतेकी संघात नव्या खेळाडूंना कधी घ्यायचे. चांगले-चांगलेखेळाडूही थकतात आणि त्यांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंनामैदानात उतरवावे लागते. याचप्रमाणे, थकलेली सरकारेमंत्रिमंडळात फेरबदल करतात. जेणेकरून नवीन रक्तालासंधी मिळेल आणि सरकारबद्दलच्या बातम्यांचे मथळेबदलतील. सध्याचे सरकार बऱ्याच काळापासून एकाचस्थितीत आहे. त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे.अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे, मात्र रोजगार आणि पगारातनाही. अनेक मोठ्या निवडणुका होणार आहेत. आणि यानिवडणुका दुखावलेल्या निवडणूक आयोगाच्यादेखरेखीखाली होतील, ज्यांची कहाणी विरोधक लिहूशकतात. जर ते (विरोधक) एखाद्या राज्यात जिंकले, तरकेंद्र सरकार आता जाणारच असा दावा ते करतील. आणिजर ते निवडणूक हरले, तर मते चोरली गेली असे म्हणतील.मोदींसाठी सकारात्मक बाजू ही आहे की, त्यांना कोणतेहीअंतर्गत आव्हान मिळत नाहीये. तिसऱ्या कार्यकाळाच्यातिसऱ्या वर्षात निर्माण झालेल्या या संकटाचा सामना कसाकरायचा, हे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहीत असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) नव्या खेळाडूंची गरज...प्रशिक्षकांना हे माहीत असते की संघातनव्या खेळाडूंना कधी घ्यायचे.चांगले-चांगले खेळाडूही थकतात. त्यांच्याजागी दुसऱ्या खेळाडूंना मैदानात उतरवावेलागते. थकलेली सरकारेही मंत्रिमंडळातफेरबदल करतात. जेणेकरून सरकार-बद्दलच्या बातम्यांचे मथळे बदलतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

खड्ड्यात फुटबॉल मारून आंदोलन; विश्रांतवाडीत प्रशासनाचे लक्ष वेधले! ⚽⚠️
शिवरायांच्या स्मारकाच्या फ्लेक्सची विटंबना; शिवभक्तांमध्ये संताप!
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात आरोपी अटकेत
देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




