एक दशकापासून एकमेकांचे ‘मित्र’ असलेले ट्रम्प आणिनेतन्याहू हे पाश्चिमात्य उदारमतवादी आणि डाव्यांच्यानिंदनीय लोकांच्या यादीत अव्वल क्रमांकावर येण्याचीचढाओढ करत आहेत. त्यांच्या पतनाची इच्छा व्यक्त केलीजाते आणि तशी भविष्यवाणीही केली जाते, पण ते त्यांच्याटीकाकारांना नेहमीच निराश करतात. ट्रम्प दोनदानिवडणुका जिंकून राष्ट्राध्यक्ष झाले. नेतन्याहू गेल्या 17 पैकी16 वर्षे सत्तेत राहिले आहेत. फक्त 2021-22 चा अपवादवगळता, जेव्हा नफ्ताली बेनेट आणि याईर लॅपिड या दोनमाजी पंतप्रधानांनी त्यांच्या विरोधात आघाडी केली होती. यावेळी निवडणुकीत नेतन्याहू यांना पुन्हा जनादेशमिळाला नाही, पण त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेतआणि अत्यंत उजव्या विचारसरणीच्या गटांचा त्यांनापाठिंबा आहे. ते आघाडी करण्याच्या चांगल्या स्थितीतआहेत. किंवा ते जुळवाजुळव करून पुन्हा निवडणुका घेऊशकतात. इस्रायलमध्ये ही काही असामान्य गोष्ट नाही.नेतन्याहू यांचा ‘विजय’ मानला जाईल, कारण त्यांनाकोणीही हरवू शकलेले नाही. हमासच्या ‘कृपेने’ त्यांनीइस्रायलला पूर्णपणे बदलून टाकले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धीगादी आयझेनकोट यांनी जर अरब पक्षांशी हातमिळवणीकेली असती, तर त्यांना बहुमत मिळाले असते. पण आता हमासला दहशतवादी घोषित केल्याशिवायकोणताही ज्यू गट अरबांशी हातमिळवणी करू शकत नाही.अरब पक्षही असे करू शकत नाहीत अाणि ते करणारहीनाहीत. अशी कोणतीही आघाडी इस्रायलच्या अरबनागरिकांचा पाठिंबा गमावल्याशिवाय बनू शकत नाही.नेतन्याहू आणि हमासने इस्रायलमध्ये असाच बदल घडवूनआणला आहे. अमेरिकेतही डेमोक्रॅटिक पक्ष थोडे संतुलन प्रस्थापितकरू शकतो. पण ज्या वास्तवाने ट्रम्प यांना सत्ता मिळवूनदिली, ते वास्तव यामुळे बदलणार नाही. स्थलांतरित,व्यापार आणि मानवाधिकारांच्या मुद्द्यांवर ट्रम्प यांनी ज्याप्रकारे आपला ठसा उमटवला आहे, तो दीर्घकाळ राहील.ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा प्रभाव समजून घेण्यासाठीआपल्याला हे मान्य करावे लागेल की, मतदार आता डोक्याऐवजी मनाने निर्णय घेतात. ते विचारधारेपेक्षा देवाणघेवाणीच्या समीकरणाला अधिक पसंती देतात. त्यांच्यासाठी अर्थव्यवस्थेला महत्त्व आहे, पण त्याहूनही अधिक महत्त्व ते या तीन मुद्द्यांना देतात: राष्ट्रीय सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा आणि स्वतःची ओळख. अमेरिकेत ट्रम्पयांनी कायदा व सुव्यवस्था, स्थलांतरित आणि ‘अतिरेकी’ राजकीय शुद्धता , स्त्री-पुरुष समानता आणि खुल्या सीमा यांसारख्या मुद्द्यांवर दुसरी निवडणूक जिंकली. कृष्णवर्णीयांच्या बाजूने उभे राहिलेले ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ आंदोलन आणि गाझाच्या प्रश्नावरील उदारमतवादीगटांच्या आक्रोशाने ट्रम्प यांनाच मदत केली. तेव्हा प्रश्ननिर्माण झाला की या मुद्द्यांवर श्वेतवर्णीय अमेरिकन आणिसर्व हिस्पॅनिक लोक कोणावर विश्वास ठेवतील? ट्रम्प की कमला हॅरिस यांच्यावर? राष्ट्रीय सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा आणि स्वतःची ओळख या मुद्द्यांच्या तुलनेत इतर मुद्दे किरकोळ आणि दुय्यम मानले जातात. इस्रायलची कथाहीअशीच आहे. तिथे एकाच मुद्द्यावर निवडणूक लढवलीगेली आणि तो मुद्दा होता राष्ट्रीय सुरक्षा. त्यांच्यासाठी‘होलोकॉस्ट’ (ज्यूंच्या नरसंहारानंतर) 7 ऑक्टोबर 2023रोजी झालेला हल्लाच सर्वाधिक वेदनादायी आहे.याव्यतिरिक्त, गेल्या सुमारे तीन दशकांपासून इराणने ‘रिंगऑफ फायर’ किंवा ‘अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ याद्वारेत्यांची कोंडी केली आहे. न संपणाऱ्या लढायांनी इस्रायलीनागरिकांना कठोर बनवले आहे, पण 7 ऑक्टोबर हीपहिलीच वेळ होती, जेव्हा ज्यू लोकसंख्येला त्यांच्याचबालेकिल्ल्यात स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ वाटले.याने इस्रायलला बदलून टाकले. याने त्यांना पुढच्यालढाईसाठी तयार केले आणि नेतन्याहू यांना सरकारविरोधीरोषापासून वाचवले. भारतासह सर्व लोकशाहींमध्ये जी ठराविकउदारमतवादी चर्चा चालते, त्याच्या विपरीत इस्रायलीलोकांची तर्कशुद्ध आणि लोकशाहीवादी परंपरा खोलवररुजलेली आहे. तिथे एक मजबूत, उदार आणि स्पष्टवक्तागट राहिला आहे. हा गट पॅलेस्टिनींबद्दल सहानुभूतीबाळगतो. तसेच वेस्ट बँकमध्ये येऊन स्थायिक झालेल्यांच्याहिंसेचा तो तिरस्कार करतो आणि एकाच भूभागात ‘दोनदेश’ असण्याच्या कल्पनेलाही पाठिंबा देतो. अनेकवर्षांपासून मी ज्या ‘हारेत्ज’ या इस्रायली वृत्तपत्राचा वाचकआहे, ते भारतीय मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांच्या तुलनेतअधिक डाव्या विचारसरणीचे आहे. हे वृत्तपत्र नेतन्याहू यांचेकट्टर टीकाकार राहिले आहे. त्यांना मोठे राजकीय नुकसानपोहोचवू शकतील अशा शोधपत्रकारितेवर आधारितबातम्या या वृत्तपत्राने दिल्या आहेत. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याबाबत इजिप्त, यूएईने दिलेल्या पूर्वसूचनेकडे नेतन्याहू यांनी कसे दुर्लक्ष केले, या बातम्याही त्यांनी दिल्या होत्या.
दुसरीकडे असे अत्यंत कट्टरपंथी पक्षही आहेत, ज्यांनावेस्ट बँक आणि गाझामधून सर्व पॅलेस्टिनींना हाकलूनद्यायचे आहे. थोडक्यात सांगायचे तर, इस्रायली समाजाततीव्र मतभेद आहेत, पण त्यांच्यात व्यक्तिपूजेचा स्वभावनाही. लक्षणीय बाब म्हणजे या मतभेदांचा निवडणुकीवरकोणताही परिणाम झाला नाही. इस्रायली नागरिकांनी दोनकट्टरवाद्यांपैकी एकाची निवड केली. प्रश्न अगदी साधाहोता: या अत्यंत असुरक्षित काळात आपण स्वतःच्यासुरक्षेसाठी कोणावर जास्त विश्वास ठेवायचा? नेतन्याहूयांनी जनरल गादी आयझेनकोट यांची आयडीएफचे प्रमुखम्हणून नियुक्ती केली होती. लष्करात असलेला त्यांचामुलगा गाझामध्ये लढताना मारला गेला आणि त्यांनी स्वतःहमासचा खात्मा करण्याचा संकल्प केला आहे. अनेकलोकांनी बदलाचा धोका पत्करण्याऐवजी विद्यमानसरकारच टिकवून ठेवण्याच्या बाजूने मतदान केले.इस्रायलमधील अरब मतदारांचे भक्कम मतदान निष्प्रभका ठरते? असे सांगितले जाते की, 11 जागा जिंकणाऱ्यागटाने नाझरेथमधील त्यांच्या मुख्यालयात पॅलेस्टिनीचिन्हांसह विजयाचा उत्सव साजरा केला. ते 7ऑक्टोबरच्या हल्ल्याचा ‘निषेध’ करतात, पण याला किंवाहमासला दहशतवाद म्हणत नाहीत. कोणताही ज्यू पक्षत्यांना जवळ करणार नाही. त्यामुळे त्यांच्या जागांनाकाहीही महत्त्व उरलेले नाही. कोणत्याही निवडणूकलोकशाहीत अल्पसंख्याकांसाठी हा एक धडा आहे.एकाकी राहणे त्यांच्यासाठी क्वचितच फायदेशीर ठरते.त्यांना मुख्य प्रवाहात जे लोक स्वीकारार्ह वाटतात,त्यांच्याशी त्यांनी जोडले गेले पाहिजे आणि आघाडी केलीपाहिजे. यासाठी वैचारिक तडजोड करण्याची गरजभासेल. अन्यथा इस्रायली अरबांप्रमाणे तेही मुख्यप्रवाहाबाहेर राहू शकतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) राष्ट्रवादाच्या परीक्षेचा प्रश्नइस्रायलमध्ये मुस्लिम अरबांची लोकसंख्या20 टक्क्यांहून अधिक आहे. ते सरकारी सेवा,व्यवसाय आणि सैन्यातही काम करत आहेत.विक्रमी मतदान करून त्यांनी संसदेत 19 जागाजिंकल्या आहेत, पण कुणीही त्यांना सोबतघेऊ इच्छित नाही. ते इस्रायलच्या राष्ट्रवादाच्यापरीक्षेत नापास होतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
- पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ऊसदरप्रश्नी 'स्वाभिमानी'चे पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; किणी टोलनाक्यावर राजू शेट्टी दाखल, वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी


























Subscribe to my channel




