आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे आपल्या विचारांमधीलविविधता होय. इतिहास साक्षीदार आहे की, प्रत्येक मोठ्याशोधामागे अशा एखाद्या व्यक्तीचा आवाज असतो, ज्यानेआपल्या काळातील प्रस्थापित मान्यतांवर प्रश्न विचारण्याचेधाडस दाखवले. पण, ‘एआय’च्या युगात आपल्यासमोरएक प्रश्न उभा राहिला आहे. हे तंत्रज्ञान आपल्या ज्ञानातीलविविधता तर संपवत नाहीये ना? आज आपण काय वाचतो, काय शोधतो, कोणत्याविचारांपर्यंत पोहोचतो आणि कशा प्रकारची उत्तरेस्वीकारतो, या सर्वांवर अल्गोरिदमचा प्रभाव आहे. दुर्दैवअसे की, ज्या डिजिटल जगाला एकेकाळी मानवी अनुभव,भाषा, संस्कृती आणि विचारांचा अथांग महासागर मानलेजायचे, तेच जग आता हळूहळू मशिन्सनी तयार केलेल्यासाहित्याने भरत चालले आहे. डिजिटल जग आता मूळजाणिवांवर नव्हे, तर अल्गोरिदमवर आधारित प्रणालींद्वारेचालवले जात आहे. आपण अशी एक ज्ञान-प्रणाली तयारकरत आहोत, जी स्वतःचाच पाया पोखरत आहे. ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ ज्या मोठ्या प्रमाणावरील डेटावरप्रशिक्षित होतात, ते डिजिटल जगही आता त्यांनीच आधीतयार केलेल्या कृत्रिम आशयाने भरत चालले आहे.संशोधक या आत्मघातकी चक्राला ‘मॉडेल ऑटोफॅगी’असे नाव देतात. या अवस्थेत एखादी प्रणाली स्वतःच्याचडेटाचा उपभोग घेऊ लागते. यामुळे ज्ञानातील विविधताआणि मूळ आशय हळूहळू कमी होत जातो. निसर्गातील जैवविविधता संपल्यावर जशी परिसंस्थाकमकुवत होते, एखादे जंगल मजबूत असते, कारण त्यातअनेक प्रकारची जैवविविधता असते. पण जर ते एकाचप्रकारच्या झाडांवर अवलंबून राहिले, तर एखादा रोग संपूर्णपरिसंस्था नष्ट करू शकतो. ज्ञानाच्या जगाचेही तसेच आहे. जेव्हा भविष्यातील मॉडेल्स हे मशिन्सनी तयार केलेल्याडेटावर वारंवार पुनरावृत्ती करतात, तेव्हा ज्ञानाचा मूळजिवंतपणा, भाषेतील ओलावा आणि सूक्ष्मता नष्ट होऊलागते. दीर्घकाळात यामुळे ‘मॉडेल कोलॅप्स’ म्हणजेचबौद्धिक ऱ्हास होतो. यात मशीनच्या प्रतिक्रिया अत्यंतकोरड्या, सर्जनशीलता नसलेल्या आणि सदोष बनतात.‘एआय’ प्रणाली स्वतःच तयार केलेल्या मापदंडांमधूनशिकत असताना खऱ्या जगातील गुंतागुंत गमावून बसते. इतिहासात अनेकदा अशा विचारांना सुरुवातीलानाकारण्यात आले, ज्यांनी नंतर जग बदलून टाकले.पोटातील अल्सरबद्दल दीर्घकाळ असे मानले जात होते की,जीवनशैली आणि तणाव हेच त्याचे कारण आहे. पण,हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा बॅक्टेरिया हे त्याचे मोठेकारण असू शकते, हे वैज्ञानिकांनी नंतर दाखवून दिले.सुरुवातीला या विचाराकडे संशयाने पाहिले गेले, पण अखेरयाच शोधाला 2005 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानितकरण्यात आले. हेच विज्ञानाचे सौंदर्य आहे. ते असहमतीआणि नव्या विचारांतूनच पुढे जाते. 1840 च्या दशकातील आयर्लंडचा दुष्काळ ही केवळ एकनैसर्गिक आपत्ती नव्हती. संपूर्ण कृषी व्यवस्था एकाच आनुवंशिक प्रजातीवर अवलंबून राहिली होती. त्यामुळेएका बुरशीजन्य संसर्गाने लाखो लोकांना उपासमारी आणिविस्थापनाच्या खाईत लोटले. ‘एआय’चे जगही अशाचडिजिटल मोनोकल्चरकडे वाटचाल करत आहे. भविष्यातील माहिती-व्यवस्था केवळ त्याच विचारांनाचालना देऊ लागली जे आधीपासूनच लोकप्रिय आहेत, तरनवीन आणि गैरसोयीचे प्रश्न हळूहळू गायब होऊ शकतात.सर्वात मोठा धोका चुकीच्या माहितीचा नाही, तरविचारांच्या एकरूपतेचा आहे. वेगळा विचार करण्याचीक्षमता हीच आपली खरी ताकद आहे. ‘एआय’च्या युगातआपल्याला तीच ताकद जपून ठेवावी लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

अमरेलीत 44 तासांच्या ऑपरेशननंतर हल्लेखोर सिंह जेरबंद
28 September 2026
पर्लकोटा नदीचा पूर ओसरला; भामरागड-आलापल्ली मार्ग चार दिवसांनंतर खुला
देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!



























Subscribe to my channel



