
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अत्यवस्थ असल्याची माहिती गोखले यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेश दामले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गोखले यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोखले यांच्या निधनाची बातमी चुकीची असल्याचं यापूर्वीच त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत असं वृषाली यांनी सांगितलं आहे. सकाळी ११ वाजता गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दामले यांनी दिली. गोखले यांची प्रकृती अद्यापही अत्यावस्थ आहे असं दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. खूप कॉम्पलिकेशन्स आहेत. त्यांच्याकडून म्हणवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत. तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. अफवांवर कोणी ही विश्वास ठेऊ नका, डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, असं दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात रात्रीपासूनच उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा गोखले यांच्या पत्नी वृषाली यांनी गोखले व्हेंटीलेटरवर असल्याचं स्पष्ट केलं. “काल सायंकाळी ते कोमामध्ये गेले. त्यानंतर ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, ते प्रतिसाद देत आहेत की नाही यासंदर्भात डॉक्टर सकाळी निर्णय घेतील,” असं विक्रम गोखेलेंच्या पत्नी ऋषाली यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं आहे. सरकारी ट्विटर हॅण्डलपासून अजय देवगण, जावेद जाफरी यासारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशीरा विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करणारी ट्विट केल्याने गोखलेंच्या मृत्यूसंदर्भातील संभ्रम निर्माण झाला होता. याचसंदर्भात स्पष्टीकरण देताना पत्नी वृषाली यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरवरुन पोस्ट केल्याने विक्रम गोखले हे सोशल मीडियावर चर्चेत आले.
विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालवल्याचे वृत्तही समोर आले होते. बुधवारी रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालवली.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




