
पुणे : पत्नीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणातून मित्राच्या साथीने दोघांनी एका व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आखाड पार्टी साजरी करण्यासाठी बोलावून वादावादीतून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आनंद उर्फ बारक्या गणपत जोरी (वय ३२, रा.पर्वती दर्शन कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सँडी नायर आणि बंडू थोरात या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत वैशाली जोरी (वय ३०) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नवी पेठेतील गांजवेवाडी येथे घडलेली घटना गुरुवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या ती उघडकीस आली. खून झालेला आनंद जोरी, सँडी नायर आणि बंडू थोरात हे तिघे सराईत गुन्हेगार असून, एकमेकांचे मित्र आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद जोरी हा बंडू थोरात याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरत होता. त्याचा थोरात याला राग होता. जोरी हा दारूच्या नशेत थोरात याला दिसला. त्यानंतर त्याने मित्र सँडी नायर याला सोबत घेऊन बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गांजवेवाडी येथे आखाड पार्टी साजरी करण्याचा बेत आखला.
दारुच्या नशेमध्ये दोघांनी धारदार शस्त्राने जोरी याच्यावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या तेथून पायी जात असलेल्या नागरिकास हा खून झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसांना याबाबत खबर दिली.
पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला. सुरूवातीला जोरी याची ओळख पटली नव्हती. तपासानंतर पोलिसांनी जोरी याची ओळख पटवून दोघा संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनी अपशब्द वापरत असल्याच्या कारणातून खून केल्याचे समोर आले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली. पुढील चौकशीसाठी दोघांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




