नक्की काय घ्यायचे हे न ठरवता खरेदीला जाण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्ही दिवाळीची खरेदी करायला बाहेर पडता. परतताना एखादे नवीन मिठाईचे दुकान सापडते. एखादी अनोळखी गल्ली किंवा सुंदर इमारत दिसते. एखादी रंजक व्यक्ती भेटते. कदाचित एखादा असा मित्र भेटून जातो. त्याची गरज असूनही तुम्हाला त्याची जाणीव नव्हती. पण आता या आनंदाची जागा मोबाइलने घेतली आहे. आज आपण घरात बसून सर्वकाही खरेदी करू शकतो. किमतींची तुलना करतो. लोकांचे अभिप्राय वाचतो. वस्तूंचे व्हिडिओ पाहतो. सवलती तपासून अवघ्या काही क्लिक्समध्ये ऑर्डर देतो. यामुळे आपली ऑनलाइन कार्ट भरते, पण शहराचा प्रत्यक्ष अनुभव सुटून जातो. आठवून पाहा. पूर्वी खरेदी म्हणजे केवळ वस्तू घेणे नव्हते. तो आपला परिसर समजून घेण्याचा भाग होता. उत्तम कपडे कुठे मिळतील, ताजी मिठाई कुठे बनेल आणि चांगले बूट कुठे मिळतील, हे आपल्याला ठाऊक असायचे. खरेदी ही केवळ वस्तू घेण्यापुरती नव्हती. ती जगाशी जोडले जाण्याची एक सुंदर संधी असायची. या दिवाळीत आपण ती सवय पुन्हा जपायला हवी. ऑनलाइन ॲप उघडण्याऐवजी घराबाहेर नजर टाका. कदाचित घराशेजारी एखादे नवीन दुकान दिसेल. हस्तकलेच्या वस्तू विकणारा तरुण व्यावसायिक भेटेल. एखादी जुनी सुंदर वास्तू किंवा अशी गल्ली दिसेल, जिथून तुम्ही रोज जाता पण कधी लक्ष दिले नव्हते. बाजारात जाऊन खरेदी करण्याचे सौंदर्य यातच आहे. ते आपल्याला अशा व्यक्ती आणि जागांशी जोडते. त्यांची शिफारस कोणताही अल्गोरिदम करू शकत नाही. दुकानात गेल्यावर तुम्ही लोकांशी बोलता. प्रश्न विचारता. त्यांच्या गोष्टी ऐकता. एखादी वस्तू खास का आहे हे समजून घेता. कधीकधी एखाद्या कलेचा इतिहासही समजतो. लखनऊचा चिकनकारी विक्रेता, मुंबईचा फुलवाला, मुरादाबादचा पितळ व्यापारी, कोलकात्याचा मिठाईवाला यांच्याशी मारलेल्या गप्पा किंवा चेन्नईत कांजीवरम साडीचे विणकाम पाहणे... या गोष्टी तुम्हाला शहराबद्दल असे काही शिकवतात, जे कोणतेही ॲप शिकवू शकत नाही. दर कमी करताना होणाऱ्या संवादातही एक वेगळीच गंमत असते. ती आपल्याला पैशांचे मूल्य आणि संवादाची कला शिकवते. समोरच्यालाही आपली उपजीविका चालवायची आहे, हे स्वीकारायला शिकवते. याहून महत्त्वाचे म्हणजे बाहेर पडल्याने आपण शहराचे सुजाण नागरिक बनतो. आपण नवीन रस्ते, इमारती आणि उपाहारगृहे पाहतो. नवीन पदार्थांची चव चाखतो. निरनिराळ्या लोकांशी बोलतो. आपले शहर कसे बदलत आहे हे समजते. शहराशी आपले नाते अधिक घट्ट होते. या सवयीला एक मानवी बाजूही आहे. सणासुदीच्या दिवसांत तुमची खरेदी ग्राहकांची वाट पाहणाऱ्या व्यक्तीच्या रोजीरोटीला हातभार लावते. यामुळे पैसा स्थानिक बाजारातच फिरतो. लहान व्यापाऱ्यांना इतरांना रोजगार देणे शक्य होते. अर्थात, ऑनलाइन खरेदीचे स्वतःचे फायदे आहेतच. यामुळे वेळ वाचतो, सोय होते आणि स्थानिक बाजारात न मिळणाऱ्या वस्तू सहज मिळतात. त्यामुळे तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारण्याची गरज नाही. फक्त आपली सोय हीच आपली जगण्याची पद्धत बनू नये, याची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग, या दिव्यांच्या सणात घरासोबतच शहराशी असलेले नातेही उजळून टाकूया. फोन बाजूला ठेवा आणि बाहेर पडा. या गल्ल्या तुम्हाला कशा थक्क करतात ते पाहा. कुटुंबाला सोबत घ्या. पूर्वी कधी न गेलेल्या बाजारात फेरफटका मारा. छोट्या दुकानातून काहीतरी खरेदी करा. तिथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीला रस्ता विचारा आणि दुकानदाराशी मनमोकळे बोला. कदाचित तुम्ही ठरवल्यापेक्षा कमी वस्तू आणाल, पण ऑनलाइन कार्टपेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर आठवणी घेऊन घरी परताल.
फंडा असा की- शहर हे केवळ रस्ते, इमारती आणि बाजारांनी बनत नाही. ते तिथे राहणाऱ्या माणसांनी आणि नात्यांनी बनते. शेवटी, खरेदी करताना आपल्याला सर्वात सुंदर गोष्टी विशिष्ट ठिकाणी भेटतात. वास्तविक आपण त्या शोधायला कधी निघालेलोच नव्हतो!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




