प्रत्येक तांत्रिक क्रांती आपल्यासोबत या शंका घेऊन येते की नवोपक्रमाचा फटका नोकऱ्यांना बसेल. इतिहासात आतापर्यंत या शंका कधीही खऱ्या ठरल्या नाहीत, पण एआयची गोष्ट वेगळी आहे. यामध्ये खरोखरच इतकी क्षमता आहे की, ते अनेक कार्ये मनुष्यांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षा कुठेही चांगल्या प्रकारे करू शकते, तर मग यावेळी मानवी श्रमासाठी असलेला धोका वास्तवात वेगळा आणि अधिक गंभीर आहे का? पण एआयबाबत आज दिसत असलेल्या वेडामध्ये एका तथ्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या चार दशकांमध्ये ज्या देशांमध्ये कामकरी वर्गाची लोकसंख्या घटत आहे, अशा देशांची संख्या शून्यावरून वाढून 55 झाली आहे. यामध्ये बहुतांश प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. ही घट आता अधिक वेगवान होत आहे, कारण कुटुंबे अपेक्षेपेक्षा कमी मुले जन्माला घालत आहेत. गेल्या वर्षी चीनमध्ये जन्मलेल्या बालकांची संख्या 1949 मध्ये या पीपल्स रिपब्लिकच्या स्थापनेनंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आली आहे. जपानमध्ये तर ही संख्या आता 1899 नंतर सर्वात कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या अंदाजांच्या तुलनेत जागतिक प्रजनन दर आता अंदाजापेक्षा 25 वर्षे आधीच लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा खाली जाण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, जगातील कामकरी वयोगटातील लोकसंख्येचा उच्चांक देखील अंदाजापेक्षा 30 वर्षे आधी येऊ शकतो. असे संकेत मिळत आहेत की, एआय आधीच प्रति कामगार उत्पादन वाढवत आहे, ज्यामुळे मानवी श्रमाची एकूण मागणी घटू शकते. पण वेगाने घटणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, एआय मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण करण्याऐवजी येणाऱ्या लेबर-शॉर्टेजच्या समस्येला कमी करण्यात अधिक मदतनीस ठरू शकतो. हे लक्षात ठेवा की, भूतकाळातील तांत्रिक क्रांतींनी नोकऱ्या नव्हे, तर उद्योग संपवले होते. 19 व्या शतकात मशीनच्या उदयाने श्रमिकांना शेतातून कारखान्यांकडे आणि नंतर कारखान्यांतून सेवा क्षेत्राकडे ढकलले होते. 1910 च्या दशकात जेव्हा कारने घोडागाड्यांची जागा घेतली, तेव्हा टांगा चालवणाऱ्यांच्या जागी ऑटो, ट्रकचालक आणि टॅक्सी ड्रायव्हर आले. 1970 च्या दशकात एटीएम मशीनने बँकांना आपला खर्च कमी करण्यास आणि अधिक शाखा उघडण्यास मदत केली. 1990 च्या दशकापासून आतापर्यंत इंटरनेटने जर अमेरिकेत सुमारे 35 लाख नोकऱ्या संपवल्या असतील, तर 1.9 कोटी नवीन नोकऱ्या देखील निर्माण केल्या होत्या. निश्चितपणे, एआय या सर्वांपेक्षा जास्त उलथापालथ करू शकते. एका अंदाजानुसार, एआय आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानासाठी- जसे की ह्युमनॉइड रोबोट्ससाठी जागतिक स्तरावर कमाल श्रम-बाजार सुमारे 400 कोटी नोकऱ्यांपर्यंतचा असू शकतो, पण सध्या तरी एआय तसे करू शकत नाही. जागतिक स्तरावर आणि अमेरिकेसारख्या एआय क्षेत्रात अग्रणी असलेल्या देशांमध्ये बेरोजगारीचा दर अनेक दशकांच्या पातळीच्या आसपासच कायम आहे. जपानमध्येही रोबोट्सची संख्या वेगाने वाढूनही वर्षानुवर्षे बेरोजगारीचा दर घटत आहे आणि श्रम-बलातील सहभाग वाढत आहे. वास्तवत: आपण हे तर पाहू शकतो की, सध्या कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत, पण भविष्यात कोणत्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत, त्यांची कल्पना इतक्या सहजपणे करू शकत नाही. अमेरिकेत आज निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांपैकी सुमारे एक-तृतीयांश अशा श्रेणीतील आहेत, ज्या 25 वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हत्या. एआय कंटेंट क्रिएटर्स, प्रॉडक्ट मॅनेजर्स, इंजिनिअर्स आणि सिस्टम डिझाइनर्स यांसारखी नवीन जॉब टायटल्स वेगाने वाढत आहेत आणि ती पारंपरिक श्रेणींमध्ये झालेल्या नोकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई मोठ्या सहजतेने करताना दिसत आहेत. एआयने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण केली तरीही माणसे शांत बसतील का? 2000 च्या दशकात ‘चायना-शॉक’ने अमेरिकेच्या जुन्या औद्योगिक क्षेत्रांतील सुमारे 60 लाख फॅक्टरी कामगारांना विस्थापित केले होते आणि हे जनक्षोभ भडकवण्यासाठी पुरेसे ठरले होते. एआयमुळे जितक्या जास्त नोकऱ्या धोक्यात येतील, तितकी जास्त शक्यता मतदार सरकारांकडे त्याचा प्रसार धिमा करण्याची मागणी करतील. कोणतीही अर्थव्यवस्था श्रमशक्ती वाढवल्याशिवाय वेगाने पुढे जाऊ शकलेली नाही. एआय उलट लेबर-शॉर्टेजच्या कमतरतेशी झुंजणाऱ्या जगाला दिलासा देऊ शकते. यामुळे व्यापक बेरोजगारी पसरण्याची शक्यता कमी आहे- किमान अनिर्बंधपणे तरी नाही. एआयच्या युगातही मनुष्य महत्त्वाचा राहील. कामगार म्हणूनही आणि एक राजकीय शक्ती म्हणूनही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
एआयमुळे व्यापक बेरोजगारी पसरण्याची शक्यता कमीच आहे. किमान अनिर्बंधपणे तरी नाही. वास्तवत: एआयच्या युगातही मनुष्य महत्त्वपूर्ण राहतील- कामगार म्हणूनही आणि एक राजकीय शक्ती म्हणूनही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




