Rashmika-Vijay Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची लव्हस्टोरी एखाद्या रोमँटिक चित्रपटालाही मागे टाकणारी ठरली आहे. मैत्रीतून सुरू झालेलं हे नातं हळूहळू प्रेमात बदललं आणि अनेक वर्षे त्यांनी ते अतिशय खासगी ठेवले. कधी एकसारख्या लोकेशनवरील सुट्ट्यांचे फोटो तर कधी सार्वजनिक कार्यक्रमांतील छोट्या क्षणांमुळे चाहत्यांना त्यांच्या नात्याची चाहूल लागत राहिली. आता दोघांनी आपल्या लग्नाला ‘द वेडिंग ऑफ वीरोश’ असं नाव देत आयुष्याची नवी सुरुवात जाहीर केली असून त्यांच्या प्रेमकथेची पुन्हा जोरदार चर्चा रंगली आहे.
विजय आणि रश्मिका यांची पहिली भेट 2018 साली Geetha Govindam या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. या चित्रपटातील त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपट प्रदर्शित होताच दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. चाहत्यांना ही जोडी केवळ पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही खास असल्याची जाणीव होऊ लागली.
‘डिअर कॉम्रेड’मुळे वाढली जवळीक
2019 मध्ये दोघे पुन्हा Dear Comrade या चित्रपटात एकत्र दिसले. हा एक तीव्र भावनिक प्रेमकथा असलेला चित्रपट होता. या काळात दोघांमधील मैत्री अधिक घट्ट झाल्याचं बोललं जातं. त्यावेळी रश्मिका वैयक्तिक आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात होती आणि विजय तिच्यासाठी मोठा आधार ठरल्याच्या चर्चा रंगल्या. इथूनच त्यांच्या नात्याला अधिक बळ मिळालं.
2020 ते 2022 दरम्यान विजय आणि रश्मिका अनेकदा विमानतळावर, कुटुंबीयांच्या कार्यक्रमांत एकत्र दिसले. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असंच सांगितलं. तरीही चाहत्यांच्या नजरा चुकल्या नाहीत. मालदीव, रोमसारख्या ठिकाणांहून शेअर केलेल्या सुट्ट्यांच्या छायाचित्रांमधील एकसारखी पार्श्वभूमी पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली की त्यांचं नातं मैत्रीच्या पुढे गेलं आहे.
‘अॅनिमल’ प्रमोशनमधील व्हायरल क्षण
2023 मध्ये रश्मिकाच्या Animal या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक मजेशीर प्रसंग घडला. अभिनेता रणबीर कपूरने गंमतीने रश्मिकाला विजयला स्पीकरवर कॉल करण्यास सांगितले. फोनवर विजयने कॅज्युअल अंदाजात केलेलं बोलणं आणि रश्मिकाचा लाजलेला चेहरा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्या एका क्षणाने चाहत्यांचा संशय अधिकच बळावला.
2025 मध्ये हैदराबादमध्ये विजयच्या घरी खासगी समारंभात दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी समोर आली. अधिकृत फोटो शेअर केले गेले नसले तरी सार्वजनिक कार्यक्रमांत दोघांच्या हातात एंगेजमेंट रिंग दिसल्याने चर्चा रंगल्या.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




