मानसी वैद्य। कवयित्री4 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

एवढा वेळ हे सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर होतं न? याच जागेवरून किती वेळा फिरला पाळणा! पण आपण पाहिलंच नाही.. आजही तो अनुभव आठवतो आणि वाटलं same goes with life! सगळं इथंच असतं, पण खरंच पाहतो का आपण?…
तसं शाळेत 'माझा आवडता ऋतू' असा निबंध लिहिताना 'हिवाळा', असं लिहिलं नाही मी कधी, पण आता आता विचार केला की वाटतं छान असतो की हा ऋतू! लहानपणी अनुभवलेला हिवाळा तर कितीतरी वेगळा आणि भारी होता! पण तेव्हा त्याची गंमत शोधण्यापेक्षा सकाळी सकाळी कुडकुडत शाळेत जावं लागतंय याचा रागच जास्त यायचा.
नोव्हेंबर डिसेंबरची थंडी सुरू झाली की आपोआप पंखे बंद व्हायला लागायचे. सटकन् एखादी शिंक आली की मग थंडीला भयंकर सिरियसली घेतलं जायचं. माळ्यावरून ट्रंकेत जपून, डांबर गोळ्या घालून ठेवलेले स्वेटर्स खाली यायचे, गोधड्या बाहेर निघायच्या. लोकरीची टोपी आणि स्वेटर हाच मग युनिफॉर्म आहे की काय, असं वाटायला लागायचं. अशात शाळेतलंही वातावरण बदलून जायचं.

सहामाही संपल्यानं कुणाला परीक्षा आणि अभ्यासाची घाई नसायची. गॅदरिंग आणि सहलीचं वारं भिरभिरायचं सगळीकडं. त्यामुळं मग शाळेत जाताना जरी वैतागलेले असलो, तरी शाळा सुटताना मात्र मजेतच असायचो आम्ही! हटकून मग शाळेबाहेर खाऊ विकायला बसणाऱ्या आजीकडून ढाळा, बोरं, छोटे आवळे घेतले जायचे. स्वेटरच्या खिशातला हा खाऊ खात वाट कधी संपायची कळायचंच नाही!
पुढे मग जानेवारी सुरू झाला की वेगळीच मजा! शाळेत चक्क जवळपास आठवडाभर सुट्टीच मिळायची संक्रांतीकरता. गोधड्या पांघरून सकाळच्या थंडीला वाकुल्या दाखवत निवांत झोपण्याचं सुख देणारी सुट्टी. शिवाय गुळपोळी, शेंगदाण्याची पोळी, तीळगुळाच्या वड्या, लाडू, बाजरीच्या टम्म फुगलेल्या भाकऱ्या नि त्यावर वितळत जाणारा शुभ्र लोण्याचा मऊसूत गोळा!
संक्रांतीसोबत थंडीसुद्धा साजरी करतोय वाटावं असे एक एक पदार्थ. त्यांचा घरभर पसरलेला दरवळ नाकात साठवत गच्चीवर जावं तर आकाशात पाहावं तिथे पतंगच पतंग! मला पतंग उडवता येत नसला, तरी समोरच्या बिल्डिंगमधल्या मुलामुलींचा पतंग आपल्या इमारतीमधली मंडळी कापतात न, हे पाहण्याची भयंकर उत्सुकता असायची. जोरदार असल्या तरी निकोप , निरागस स्पर्धा असायच्या या.
याच दिवसात सोलापुरात मानाच्या काठ्यांची पूजा असायची. ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या मंदिरात. खरं म्हणजे शहरभरातच मोठा उत्सव असायचा. गड्डा भरायचा! गड्ड्यावर जाणं जवळपास 'शास्त्र असतं' म्हणण्याइतकं महत्त्वाचं होतं. सुट्टीतच एक सोयीचा दिवस ठरवून सगळं कुटुंब फिरायला निघायचं! फूड कोर्ट कम शॉपिंग मॉल कम अम्यूझमेंट पार्क असं सगळंच असायचा गड्डा! खेळण्यातल्या रायफलनं नेमबाजी करणं असो, भूतबंगला खोटा आहे, ठाऊक असूनही भिणं असो, वा आयनामहलमधल्या करामतींमधे रमणं असो! फार साधा, गोड आनंद होता तो.
एकदा असेच गड्ड्यावर गेलो होतो आणि कधी नव्हे ते पाळण्याचं तिकीट काढलं मी. अगदी अलगद एक चक्कर पार पडली आणि हळूहळू पाळण्यानं वेग पकडला. सगळी शक्ती एकवटून ग्रील धरत बेंबीच्या देठापासून किंचाळणारी मी हे अचाट विनोदी दृश्य असावं! शेवटी थोड्या वेळानंतर एकेका पाळण्यामधले लोक उतरण्यासाठी हळूहळू थांबवले जायला लागले. मी डोळे उघडून पाहिलं तर सगळ्यात उंच जागी येऊन थांबला होता माझा पाळणा. इतक्या उंचावरून भवतीचा तो झगमगता गड्डा, सगळी दुकानं, थोडं दूर चमकणारं तलावामधलं पाणी, त्याहीपलीकडचं शहर, इवली इवली माणसं, नि ह्या सगळ्यावर पसरलेलं आकाश, चांदणं आणि चंद्र!
वाटलं, एवढा वेळ हे सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर होतं न? याच जागेवरून किती वेळा फिरला पाळणा! पण आपण पाहिलंच नाही.. आजही तो अनुभव आठवतो आणि वाटलं same goes with life! सगळं इथंच असतं, पण खरंच पाहतो का आपण? असो! परवा एका रीलमधे फार सुंदर शब्द ऐकला, Apricity. त्याचा अर्थय थंडीच्या दिवसांमधल्या उन्हामुळं मिळणारी ऊब! वाटलं, ह्या गोड आठवणी म्हणजेसुद्धा आपल्याकरता apricity आहेत की. तेव्हा या मकरसंक्रांतीच्या निमित्तानं, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या रूपात ही Apricity गवसो याच शुभेच्छा!
This post was originally published on this site.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




