
मालेगाव : माजी आमदार शेख रशीद यांच्या राजकीय कारकीर्दीस ४० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत शेख यांचा येथे जंगी सत्कार पार पडला. या समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगावातील राजकीय खुंटा अधिक बळकट करण्याचे जोरकस प्रयत्न केल्याचे दिसून आले. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सत्कार सोहळय़ातील शक्तिप्रदर्शन आणि विरोधी एमआयएम पक्षाला केले गेलेले लक्ष्य बघता येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती कशी असेल, याची झलकच या निमित्ताने बघावयास मिळाली.
नगरसेवकापासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या शेख रशीद यांनी नंतर नगराध्यक्ष, विधानसभेचे आमदार व शहराचे महापौर अशी पदे भूषविली. शहर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्षे त्यांच्याकडे होती. २९ वर्षे विधानसभेत शहराचे प्रतिनिधित्व केलेले निहाल अहमद यांच्यासारख्या बडय़ा समाजवादी नेत्याला पराभूत करण्याची किमया शेख यांनी साधली होती. वेगवेगळय़ा पक्षांमध्ये गोतावळा निर्माण करणारे शेख हे एक मुरब्बी राजकारणी म्हणून परिचित आहेत. माजी आमदार असलेले त्यांचे पुत्र असिफ शेख यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसला आपलेसे केले होते. त्यापाठोपाठ रशीद शेख यांनी महापौर पत्नी ताहेरा शेख यांच्यासह २८ नगरसेवकांना सोबत घेत काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. घाऊक पद्धतीच्या या पक्षांतरामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष अशी प्रतिमा निर्माण झाली. पक्षाची ही ताकद लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. शेख रशीद यांच्या सत्काराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याच दृष्टीने संधी साधण्याचा प्रयत्न केला गेला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गेल्या महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटात गेलेले बंदरे व खनिकर्म खात्याचे मंत्री दादा भुसे आणि शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख कुटुंबीयांचे राजकीय संबंधही बिनसले आहेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व भुसेंची शिवसेना यांच्यात सख्य होणे अवघड दिसते. या पार्श्वभूमीवर कुणाचा पािठबा न घेता महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आवश्यक ती रसद पुरविण्याची पक्षाची तयारी सुरू असल्याचे या सत्कार समारंभात जाणवले.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून एमआयएमकडे बघितले जाते. त्यामुळे अजित पवार यांनी या समारंभात एमआयएमचे स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती यांना लक्ष्य केले. भाजपचे राजकीय भले करण्यासाठी बी टीम म्हणून कार्यरत असल्याचा एमआयएमवर नेहमीच आरोप केला जात असतो. पवार यांनी या आरोपाचा येथे पुनरुच्चार केला. त्यासाठी आमदार मौलाना यांचे भाजपशी कसे सख्य वाढत आहे, याचा दाखला त्यांनी दिला. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी मालेगावचा दौरा केला होता. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचा पक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यास भाजप व शिंदे गटातील आमदार उपस्थित होते. या व्यासपीठावर आमदार मौलाना मुफ्ती हेदेखील उपस्थित राहिल्याने त्यावेळी शहरात बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. हा धागा पकडत पवार यांनी आपल्या भाषणात मौलानांच्या भूमिकेबद्दलच प्रश्न उपस्थित केला. मौलानांचे भाजप-शिंदे गटाच्या व्यासपीठावर जाणे आणि या पक्षांशी त्यांची वाढणारी सलगी हा जनतेला धोका देण्याचा प्रकार असल्याची टीका पवार यांनी केली. अजित पवार यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यशैलीवरदेखील टीकास्त्र सोडले. विरोधकांचा आवाज दडपण्याचे आणि जातीयवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालेगावच्या विकासासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करत राजकीय व सामाजिक जीवनात शेख रशीद यांनी आजवर बजावलेल्या कामगिरीचा गौरवही त्यांनी आवर्जून केला.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




