पुणे - बारामती येथील केंद्रीय वस्तु आणि सेवा कर विभागाच्या (जीएसटी) (GST Department) अधिक्षकास (Superintendent) पाच हजार रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. संबंधित अधिक्षक हा एका कंपनीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी कंपनीच्या मालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेत होता. दरम्यान, या अधिकाऱ्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावली आहे.
कुलदीप शर्मा असे अटक केलेल्या जीएसटी अधिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकाने "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदाराच्या बारामती परिसरात दोन कंपन्या आहेत. या कंपनीच्या कागदपत्रांची पडताळणीचे काम जीएसटी अधिक्षक कुलदीप शर्मा याच्याकडे आले होते. संबंधीत कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सेवा कराबाबत कंपनीचा सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी शर्मा याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
मात्र लाच देणे तक्रारदारास मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार, त्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी करून मंगळवारी सापळा रचला. त्यावेळी शर्मा यास तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यास अटक केल्यानंतर पथकाने त्याच्या बारामती येथील अंबीकानगर येथील श्री हाईट्स येथील घरातुन काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहे.
दरम्यान, शर्मा यास बुधवारी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शर्माकडे त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करायची आहे, त्याच्या आवाजाचे नमुने तपासायचे आहेत, त्यासाठी त्यास तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक शीतल शेंडगे यांनी केली होती. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून शर्माला 22 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. याबाबतचा आदेश विशेष न्यायाधीश गिरीष भालचंद्र यांनी दिला आहे.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




