
पुणे : वेताळ टेकडीवरील बालभारती पौड फाटा प्रकल्पाला विरोध करत सुरू असताना या प्रकल्पाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. या निविदेसाठी पुढील दोन आठवड्यात अटी व शर्ती निश्चीत करण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने या प्रकल्पास विरोध करत हा प्रकल्प करण्यापेक्षा सार्वजनिक सेनापती बापट रस्ता ते कोथरूड यामार्गावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा अशी मागणी करण्यात आली.
पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपये खर्च करून बालभारती ते पौड फाटा या दरम्यान वेताळ टेकडीवरून नवीन रस्ता आखला आहे. पण या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने त्यास पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध केला आहे. त्याविरोधात सातत्याने विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणीही केली आहे.
मनसे जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस, सरचिटणीस अनिल राणे, उपाध्यक्ष विशाल शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागस्कर यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
या प्रकल्पामुळे विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कमी होणार नाही, केवळ १२ टक्के कोंडी सुटणार आहे. या रस्त्यामुळे पैशाचा अपव्यय, पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याने प्रकल्प फायदेशीर नाही. त्यामुळे तो रद्द करावा. त्यापेक्षा हा निधी या भागातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वापरावा, पीएमटी व्यवस्था सुधारावी अशी मागणी केल्याचे संभूस यांनी सांगितले.
मार्च महिन्यात निघणार होती निविदा
या प्रकल्पाची निविदा रद्द केलेली नाही, सध्या निविदेच्या अटी व शर्ती नश्त करण्याचे काम सुरू आहे. त्यास दोन आठवडे लागतील, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, बालभारती पौड फाटा प्रकल्पाचा अभ्यास झाला असल्याचे सांगत मार्च महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पाची निविदा काढली जाणार होती.
मात्र, आता प्रशासनाने या निविदेच्या अटी व शर्ती निश्चीत झाल्या नसल्याचे सांगत आणखी दोन आठवडे तरी निविदा निघणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आंदोलकांकडून निविदा रद्द झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली जात असून, त्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी, मनसेकडून पाठिंबा दिला जात असल्याने नेमके काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
रस्ता हवा पण बोगदा नको - निकम
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते नीलेश निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन बालभारती पौड फाटा प्रकल्पास पाठिंबा दिला. १९९७ पासून या प्रकल्पासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. २५ मिनिटांचा प्रवास अवघ्या तीन मिनिटात पूर्ण होईल, यामुळे इंधन, पैसे याची बचत होईल, विधी महाविद्यालय रस्त्यावरील २० गल्ल्यांमधील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
प्रदूषण कमी होईल यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र, पंचवटी-सुतारदरा-गोखलेनगर हा बोगदा करू नये. या प्रकल्पामुळे पानशेत पूरग्रस्तांची घरे तोडावी लागतील. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा दावा निकम यांनी केला.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



