पुणे - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या २० एकर जागेपैकी १० दहा एकर जागेवर पुणे महानगरपालिकेने आरक्षण टाकले आहे. याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनाने सुमारे पंचवीस वर्षापूर्वीच घेतला आहे. या आरक्षणामुळे भविष्यात कात्रज डेअरीला जागेअभावी उपपदार्थ निर्मिती आणि विपणनासाठी मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. या आरक्षणाबाबतची माहिती डेअरीच्या नवीन संचालक मंडळाने पालकमंत्री अजित पवार यांना दिली आहे. यानुसार पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे.
कात्रज डेअरीच्या निम्या जागेवर आरक्षण पडल्याचे समजता, पालकमंत्री पवार यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी याबाबत फोनद्वारे चर्चा केली आहे. हे आरक्षण उठविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेशही पवार यांनी विक्रम कुमार यांना दिला आहे. दरम्यान, हे आरक्षण उठविण्यासाठी आणि कात्रज डेअरीच्या उत्पादनांचा आवाका वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डेअरीच्या नव्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी सांगितले.
पुण्यातील कात्रज परिसरात जिल्हा दूध संघाचे मुख्यालय आणि डेअरी आहे. या दूध संघाच्या स्थापनेनंतर डेअरीच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून सुमारे २२ एकर गायरान जमीन मिळालेली आहे. यापैकी सुमारे अडीच एकर क्षेत्र हे न्यायालयीन आदेशानुसार भारती विद्यापीठाला मिळाले आहे. सध्या तेथे २० एकर क्षेत्र शिल्लक आहे. परंतु यापैकी काही जागा सार्वजनिक रस्त्यासाठी देण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ आणि सार्वजनिक रस्त्यासाठी गेलेल्या जागेनंतर शिल्लक राहिलेल्या जागेतही पालिकेने १९९७ मध्ये क्रीडांगणासाठी आरक्षण टाकल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. परंतु हे आरक्षण टाकताना ही जागा कात्रज डेअरीच्या नावावर नव्हती. त्यामुळे तेव्हा या आरक्षणाबाबत फारशी माहिती उपलब्ध झाली नव्हती, असे या दूध संघाचे मावळते अध्यक्ष विष्णू हिंगे, माजी अध्यक्ष गोपाळ म्हस्के आणि बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.
जिल्हा दूध संघाच्या नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची सोमवारी (ता.४) निवड करण्यात येणार होती. त्यामुळे पालकमंत्री पवार यांनी या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध व्हावी, या उद्देशाने नावे निश्चित करण्यासाठी रविवारी (ता.३) सायंकाळी सहा वाजता सर्व नवीन संचालकांची बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत संचालक मंडळाने पवार यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पवार यांनी या बैठकीतूनच पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना फोन लावल्याचे संचालकांनी सांगितले.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




