
पुणे : जिल्ह्यात बेकायदा गौणखनिज उत्खनन, वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडून नगण्य दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडे – वारीवरूनच स्पष्ट झाली आहे. तसेच, केलेल्या कारवायांमध्ये संबंधितांना किरकोळ दंड आकारण्यात आला असून चालू आर्थिक वर्षात अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी संबंधितांना १७ कोटी १५ लाखांचा दंड आकारण्यात आला, मात्र प्रत्यक्षात केवळ ६९ लाख २१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच ८८ प्रकरणांत एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
शहरात विविध प्रकल्पांसाठी, तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन होत आहे. मावळ, मुळशी, दौंड, शिरूर आणि इंदापूर अशा विविध तालुक्यांत महसूल विभागाने चालू आर्थिक वर्षात ८८ प्रकरणांची नोंद केली आहे. त्यामध्ये वाळू, मुरूम, माती, दगड आमि अन्य खनिज (सिलीका, लॅट्रेराईट व इतर) यांची अवैध वाहतूक, उत्खनन यांचा समावेश आहे. वाळूची १९, मुरूम ३२, माती ३४, दगड तीन अशी ८८ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या प्रकरणांत संबंधितांना १७ कोटी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ६९ लाख २१ हजार रुपयांची वसुली करण्यात जिल्हा खनिकर्म विभागाला यश मिळाले आहे. तसेच अवैध वाहतुकीसाठी ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत, तर अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेली एकही यंत्रसामुग्री जप्त करण्यात आलेली नाही.
परिणामी संबंधितांना कारवाईचा धाक राहिलेला नाही. अनेक ठिकाणी कारवाई होऊनही बेकायदा उत्खनन सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे.दरम्यान, पुण्याचा चहूबाजूने विकास होत असून नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अवैध उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असूनही जिल्हा खनिकर्म विभागाकडून नगण्य कारवाई होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
अवैध उत्खननाचा आढावा
गौणखनिज प्रकार अवैध उत्खनन प्रकरणे
वाळू- १९
मुरूम -३२
माती -३४
दगड -३
अन्य खनिज : 0
एकूण : ८८
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




