उत्तर प्रदेश आणि पंजाब ही दोन महत्त्वाची राज्ये आहेत.येथे निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष यानिवडणुकांसाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.नवनवीन जबाबदाऱ्या तयार केल्या जात आहेत आणिनवीन प्रभारी नेमले जात आहेत. सर्व बाजूंनी आणि पूर्णताकदीने तयारी सुरू आहे. कुणी बिनधास्त बसले असेल,एखादा काहीही तयारी करत नसेल, तर ते आपण आहोत.सामान्य माणसे! सर्वसामान्य मतदार! कारण आपल्याला कुणी काहीही म्हणो—अन्नदाता,जनता जनार्दन किंवा आणखी काही—पण सत्य हेचआहे की, दर दोन, अडीच किंवा पाच वर्षांनी होणाऱ्या यानिवडणुकांचे आपण मालक नाही. आपण आपल्यामनाला स्वातंत्र्य दिले आहे, ते फक्त एवढेच की आपणस्वतःसाठी पिंजरा निवडू शकतो. शेवटी राहायचे तरकैदेतच आहे. देशात विविध प्रकारचे कैदखाने आहेत...
विविध प्रकारच्या कैद्यांच्या अवस्थाही.
मुले वजनदार दप्तराच्या ओझ्याखाली शिक्षणात बंदिस्तआहेत. मुली स्वतःच्या सुरक्षिततेच्या भीतीपोटीस्वतःमध्येच सुरक्षित राहण्यास भाग पडल्या आहेत.महिला, वृद्धांच्या बंधनांना तर सीमाच उरलेली नाही.तथाकथित सुसंस्कृत समाज या बंदिस्तपणाला घर,ऑफिस, गल्ली, शेत, शिवार, रस्ता आणि बाजारपेठअशी नावे देतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या कैदेत अडकला आहे, तेव्हा कसले स्वातंत्र्य, कसली लोकशाही आणि कसली निवडणूक? या पक्षांना, या नेत्यांना खरोखरच निवडणूक जिंकायची असेल, तर त्यांनी आधी स्वत:लाया कैदेतून मुक्त करावे. मग त्यांनी राज्य करावे. अगदी चहुकडे. एकतर्फी. मग कोणत्याही नेत्याला मतासाठी गयावया करावी लागणार नाही. लोक स्वतःच आपला तारणहार निवडून देतील. इंग्रज निघून गेल्यानंतर आज विविध बंदिवास दिसतात. त्यातील बहुतांश राजकीय व्यवस्थेनेच उभारले आहेत. आणि यात आपल्यालानवल वाटण्याचेही काही कारण नाही. कारण प्रत्येक बंदिवासाचे उद्घाटन होत असताना आपणच मोठ्या उत्साहाने टाळ्या वाजवल्या आहेत.
सुसंस्कृत समाज म्हटला जाणारा हा मोठा तुरुंग तरआपण स्वतःच तयार केला आहे. जुनाट विचारांच्याचुकीच्या प्रथांच्या अनेक शाखा आपण उघडल्या आहेत. त्यात आपले बालपण, तारुण्य आणि म्हातारपणअडकले आहे. निवडणुकीच्या वेळीही ही बंधने काम करतात. जातीयवादाची कैद ही सर्वात मोठी वदीर्घकालीन आहे. त्यानंतर गाव, शहर, पंचायत, सरपंच,पाटील व नातेवाईक यांचा प्रांतवाद वेगळेच तुरुंग तयारकरतो. निवडणुकीच्या काळात ही बंधने कानठळ्याबसवतात. हिवाळ्याच्या दिवसांत दातांमध्ये फणी धरूनफुंकर मारल्यावर एक प्रकारचा विस्कळीत, बारीक आणिनुकत्याच वयात येणाऱ्या मुलांसारखा तुटक आवाजयेतो, अगदी तसाच. मतदान करताना हे आवाज आणखीमोठे होतात. आपण ही बंधने, या साखळ्या तोडून मतदानकरणार नाही तोपर्यंत अशीच सरकारे येत राहतील.बेफिकीर आणि आळशी. लोकप्रतिनिधी असेच राहतील.हव्यास असलेले आणि टोळीबाज. खरे तर, आपल्यालाया बेड्यांची, या कैदेची सवय झाली आहे. सरकार भ्रष्टनसेल तर काम लवकर होणार नाही असे आपल्यालावाटते. व्यवस्था नीट झाली तर काम पक्के होणार नाहीअसे आपल्याला वाटते. आणि लोकप्रतिनिधी हव्यासअसलेला किंवा टोळीबाज नसेल तर तो बावळट किंवाकमकुवत आहे असे आपण मानतो. मत विकून चांगल्यासरकारचे स्वप्न पाहणाऱ्या मानसिकतेतून आपल्यालाबाहेर पडावेच लागेल. अन्यथा आपण असेच भरडलेजाऊ. व्यवस्था अशीच चालत राहील आणि सरकारेअशीच येत-जात राहतील—घोटाळे करत, सत्य दाबूनटाकत, प्रामाणिकपणाला बाजूला फेकत आणि जनतेलावाऱ्यावर सोडून देणारी. आपली अवस्था आज आहेतशीच राहील. विजेच्या बोर्डावर लावलेल्या जुन्या,गंजलेल्या आणि पानाच्या डागांसारख्या दिसणाऱ्या फ्यूजप्लेटसारखी. औषधांच्या बाटल्यांवर एक अंतिम मुदतलिहिलेली असते. औषध घेताना बहुतेक लोक तीचतारीख पाहतात. ती मुदत संपली की औषध निरुपयोगीठरते. कधीकधी तर ते विषारीही बनते. ‘आप'' नवीनआला होता, तेव्हा त्यांना पाहून काही अंशी वाटले होतेकी, जुन्या पक्षांची मुदत आता संपली आहे. पण तसे होऊशकले नाही. जुने पक्ष अधिक घट्ट रोवले गेले. वाढत गेलेव त्यांच्या भक्कम पकडीने ‘आप''ची पार दाणादाणउडवून दिली. वास्तविक, राजकारण हे नात्यांचा,भावनांचा आणि मानवी मूल्यांचा अनादर केला जातोअशी संस्कृती आहे. या शब्दांची जाणीवही ठेवली जातनाही. एकंदरीत, ही संस्कृती म्हणजेच भावनाशून्यतेचेप्रतीक आहे. ...आणि भावना नसतात तिथेअपमानाशिवाय दुसरे काहीही उरत नाही. आपल्याला या बेड्यांची ,या कैदेची सवय झालीयेखरे तर, आपण या बेड्यांचे व कैदेचे सवयझालेले लोक आहोत. सरकार भ्रष्ट नसेलतर काम लवकर होणार नाही , व्यवस्थानीट झाली तर काम होणार नाही असेवाटते. लोकप्रतिनिधी हावरट किंवाटोळीबाज नसेल तर तो बावळट किंवाकमकुवत आहे असे आपण मानतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




