भारत आणि इटली यांचे संबंध आता निर्णायक टप्प्यावरआले आहेत. गेल्या काही वर्षांत उभय देशांतीलसंबंधांचा अभूतपूर्व वेगाने विस्तार झाला आहे. हे संबंधआता केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नसून स्वातंत्र्य,लोकशाही मूल्ये आणि भविष्यासंदर्भातील समानदृष्टिकोनावर आधारित विशेष रणनीतिक भागीदारीतरूपांतरित झाले आहेत. जगभरात मोठे बदल होतअसताना भारत आणि इटलीमधील भागीदारी उच्चराजकीय आणि संस्थात्मक संवादातून अधिक मजबूतहोत आहे. या संबंधांना आता अधिक व्यापक स्वरूपमिळत असून त्यात दोन्ही देशांची आर्थिक शक्ती,सामाजिक सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसायांचाही समावेश आहे. आमचे सहकार्य हे दर्शवते की, 21 व्या शतकातील समृद्धीआणि सुरक्षा या देशांच्या नवोन्मेष क्षमतेवर, ऊर्जासंक्रमणाच्या व्यवस्थापनावर आणि रणनीतिकआत्मनिर्भरतेवर अवलंबून असतील. याच उद्देशाने आम्हीद्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि विविध करण्याचानिर्धार केला आहे, जेणेकरून दोन्ही देशांच्या पूरकताकदींचा अधिक चांगला उपयोग करता येईल. इटलीची डिझाइन क्षमता, उत्कृष्ट उत्पादन कौशल्यआणि जागतिक दर्जाची सुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान क्षमताभारताच्या वेगवान आर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता आणि 100 हून अधिकयुनिकॉर्न तसेच 2 लाख स्टार्टअप्स असलेल्या उद्योजकीयपरिसंस्थेशी जोडून मजबूत समन्वय निर्माण करण्याचेआमचे उद्दिष्ट आहे. हे केवळ दोन व्यवस्थांचे साधे एकत्रीकरण नाही, तरदोन्ही देशांच्या औद्योगिक क्षमतांना अधिक बळकटीदेणारी सामायिक मूल्यनिर्मिती आहे. युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापारकरारामुळे (एफटीए) दोन्ही दिशांनी व्यापार आणि गुंतवणुकीस नवे मार्ग खुले होत आहेत. 2029 पर्यंत भारत आणि इटलीमधील व्यापार 20 अब्ज युरोपेक्षा अधिक नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. संरक्षण, एअरोस्पेस, स्वच्छ तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, ऑटोमोबाईल सुटे भाग, रसायने, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग, कृषी-खाद्य क्षेत्र आणि पर्यटनया क्षेत्रांवर विशेष भर राहणार आहे. ‘मेड इन इटली’ हे नेहमीच जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे प्रतीक राहिले आहे आणि आता त्याचा ‘मेक इनइंडिया’च्या उच्च गुणवत्तेच्या उद्दिष्टांशी नैसर्गिक मेळदिसून येतो. भारतात उत्पादनासाठी इटालियन कंपन्यांची वाढती रुची आणि इटलीमध्ये भारतीय उद्योगांची वाढती उपस्थिती — ती आता दोन्ही बाजूंनी मिळून एकहजारांहून अधिक झाली आहे — हे सकारात्मक संकेत आहेत. यामुळे पुरवठा साखळीचे एकत्रीकरण अधिक मजबूत होईल. तांत्रिक नवोन्मेष हा आमच्या भागीदारीचा महत्त्वाचा पाया आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम कॉम्प्युटिंग,प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे आणिडिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये जग मोठ्यातांत्रिक बदलाच्या उंबरठ्यावर आहे. भारताची नवोन्मेषक्षमता आणि कुशल मनुष्यबळ तसेच इटलीची प्रगतऔद्योगिक शक्ती या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक नैसर्गिकआणि रणनीतिक बनवते. दोन्ही देशांतील विद्यापीठे आणिसंशोधन संस्थांमधील वाढते सहकार्यही याला बळ देणारआहे. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा(डीपीआय) आधीच ग्लोबल साउथमधील अनेकदेशांसाठी आकर्षणाचा विषय बनली आहे. विशेषतःएआयचा समाज आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठाप्रभाव पडत आहे. एआयचा विकास जबाबदार आणिमानवकेंद्रित पद्धतीने व्हावा, यासाठी भारत आणि इटलीदीर्घकाळापासून सहकार्य करत आहेत. दोन्ही देशएआयला सर्वसमावेशक विकासाचे प्रभावी साधनमानतात, विशेषतः ग्लोबल साउथ देशांसाठी. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि बहुभाषिकतंत्रज्ञानाच्या मदतीने एआय सामाजिक व डिजिटल दरीकमी करू शकतो. भारताची ‘मानवकेंद्रित तंत्रज्ञान’संकल्पना आणि इटलीची ‘एल्गोर-एथिक्स’ संकल्पनायांवर आधारित भागीदारीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता सामाजिकसक्षमीकरणाचे साधन ठरेल, याची खात्री केली जाईल.सुरक्षित डिजिटल सहकार्य, क्षमता विकास आणि मजबूतसायबर पायाभूत सुविधांशी संबंधित सर्वोत्तमकार्यपद्धतींच्या आदानप्रदानातून आम्ही खुले, विश्वासार्हआणि समान डिजिटल वातावरण निर्माण करू इच्छितो.तंत्रज्ञानाने मानवाची जागा घेऊ नये किंवा त्याचे मूलभूतअधिकार कमकुवत करू नयेत, हा आमचा स्पष्टदृष्टिकोन आहे. तसेच, एआयचा वापर जनमत प्रभावितकरण्यासाठी किंवा लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेपकरण्यासाठी होऊ नये. राष्ट्रांच्या समृद्धीसाठी सुरक्षा आणि स्थैर्य अत्यावश्यकआहेत. त्यामुळे भारत आणि इटली संरक्षण, सुरक्षा आणिरणनीतिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूतकरू इच्छितात. महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेसोबतचदहशतवाद, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळे, अंमलीपदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि मानवी तस्करीयांसारख्या आव्हानांविरोधात लढण्यासाठी हे सहकार्यमहत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय संस्कृतीतील ‘धर्म’ ही संकल्पना आपल्याकृतींना दिशा देणाऱ्या जबाबदारीची भावना दर्शवते. तसेच‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आजच्या परस्परांशीजोडलेल्या डिजिटल युगात अधिक महत्त्वाची वाटते. हेमूल्य इटलीच्या पुनर्जागरणकालीन मानवतावादीपरंपरेशीही सुसंगत आहेत. यामुळे लोककेंद्रित दृष्टिकोनठेवत भारत-इटली भागीदारीला अधिक मजबूत,आधुनिक आणि भविष्याभिमुख आधार देणे हेच आमचेसामायिक उद्दिष्ट आहे. इटलीची डिझाइन क्षमता, उत्पादनकौशल्य आणि जागतिक दर्जाचेसुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान भारताच्या वेगवानआर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता,नवकल्पना तसेच 100 हून अधिकयुनिकॉर्न आणि 2 लाख स्टार्ट-अप्सच्याउद्योजकीय परिसंस्थेशी जोडून प्रभावीसमन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




