देशात करप्रणालीला नवसंशोधनाच्या क्षेत्रात ‘टॅक्सटेररिझम'' असे संबोधले जाऊ लागले आहे. पंतप्रधानवारंवार सांगतात की, भारताचे भविष्य केवळ ग्राहकबाजारपेठ बनण्यात नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वमिळवण्यात आहे. उद्योजकता आणि नवसंशोधनालाचालना देण्यासाठी सरकारने स्टँड-अप इंडिया आणिस्टार्ट-अप इंडिया यांसारख्या योजना सुरू केल्या.त्यामुळे भारतीय संशोधकांना प्रोत्साहनही मिळाले. मात्रसरकारी करप्रणालीने अनेक नकारात्मक अडथळेनिर्माण केले. हे तीन उदाहरणांतून समजून घेता येईल. पहिले उदाहरण एंजेल फंडचे आहे. क्षमता असलेल्या स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांनी हा निधी दिला. परंतुआयकर विभागाने तो स्टार्टअप्सचे उत्पन्न मानून त्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली. परिणामी नवसंशोधनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी छोट्या स्टार्टअप्सना आपले मर्यादित मनुष्यबळ कायदेशीर अडचणी सोडवण्यात खर्च करावे लागले. दुसरेउदाहरण आयआयटी संस्थांचे आहे. या संस्थांकडे संशोधनासाठी मर्यादित निधी असतो. मात्र कालांतराने उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र इंडस्ट्री फंड उभारले. या संशोधनाचे निष्कर्ष त्वरित प्रत्यक्षातहीउतरवले जात होते. कारण समस्येची ओळख आणिगरज यांचे मूल्यांकन आधीच झालेले असे. मात्र, एकेदिवशी या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनाही जीएसटीच्यानोटिसा मिळाल्या. उद्योगांकडून वित्तपुरवठा होणाऱ्यासंशोधनाला सेवा श्रेणीत समाविष्ट करण्यात आले. यादोन्ही प्रकरणांमुळे संशोधनाची संपूर्ण प्रक्रिया जवळपासदोन वर्षे विस्कळीत झाली. अखेर सरकारने हे प्रावधानमागे घेतल्यानंतरच परिस्थिती पूर्ववत झाली. दुसरे उदाहरण ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे आहे. 2023मध्ये ‘गेम ऑफ स्किल'' ( विविध न्यायालयीननिर्णयांमध्ये तसे वर्गीकृत करण्यात आले आहे) यावरीलजीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला. हीकरवाढ पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात आली. म्हणजेचवाढीव कर 2017 पासून लागू करण्यात आला. यानिर्णयामुळे गेमिंग क्षेत्रातील नवसंशोधन जवळपास ठप्पझाले. नवसंशोधन केवळ डीआरडीओसारख्या मोठ्यासंस्थांमध्येच होत नाही. ते लहान स्टार्टअप्स व त्यांच्यानवकल्पनांच्या एकत्रित प्रयत्नांचेही फलित असते. याअडथळ्यांमुळे भारताने आपली आघाडी गमावली.भारताला नवसंशोधनाचे केंद्र बनायचे असेल आणितंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबन वाढवायचे असेल, तरनव्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानांकडे महसूलवसुलीच्या दृष्टीकोनातून न पाहणे आवश्यक नाही का?देशात औद्योगिकीकरणाला चालना दिली जात होती.तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी दीर्घकालीन धोरणेआखली होती. तसेच करसवलतीही दिल्या होत्या. आतापुन्हा एकदा या विषयाकडे व्यापक दृष्टीने पाहण्याचीवेळ आलेली नाही का? गुंतवणूक आकर्षितकरण्यासाठी दीर्घकालीन, स्थिर, विश्वासार्ह वसमन्वयित धोरणात्मक चौकट तयार करण्याची गरजआहे. त्यामुळे स्थिर धोरणे असलेल्या देशांकडेवळणाऱ्या स्टार्टअप्सनाही विश्वास मिळू शकेल.अन्यथा भारताची प्रतिमा केवळ परदेशात होणारेनवसंशोधन स्वीकारणाऱ्या देशाची बनेल. आज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्याकरांबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज आहे.विशेषतः आरोग्य आणि शिक्षण उपकरासारखे अतिरिक्तकर आकारले जात असताना ही गरज अधिकमहत्त्वाची ठरते. आयकरावरही उपकर आकारलेजातात. या माध्यमातून सातत्याने निधी जमा होतअसेल, तर देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणिआरोग्यसेवा उपलब्ध होत आहेत, याची खात्री करणेआवश्यक आहे. त्याचे सामाजिक लेखापरीक्षणही झालेपाहिजे. भारताकडे प्रचंड क्षमता आहे. ज्ञान आणिप्रतिभेची कमतरता नाही. मात्र, संशोधन आणिनवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापकदृष्टीकोनाचा अभाव हीच सर्वात मोठी अडचण आहे.भारताला जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्था बनायचेअसेल, तर अडथळेमुक्त संशोधन आणिनवसंशोधनाला प्रोत्साहन देण्याशिवाय दुसरा शॉर्टकटनाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) नवसंशोधन केवळ मोठ्या संस्थांमध्येहोत नाही तर लहान स्टार्टअप्स आणित्यांच्या नवकल्पनांच्या एकत्रितप्रयत्नांतूनही ते घडते. भारताला तंत्रज्ञानक्षेत्रात आघाडी घ्यायची असेल तरनव्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानांनाकरसवलती आणि करातील दिलासा देणेआवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




